Jaya Bachchan च्या ‘या’ सवयीला वैतागली मुलगी श्वेता; म्हणाली, “मला घर सोडून पळून…”

Jaya Bachchan : ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन (Shweta Bachchan) सध्या चर्चेत आहे. ती तिची मुलगी नव्या नवेली नंदासोबत तिचा पॉडकास्ट शो ‘व्हॉट द हेल नव्या’ होस्ट करताना दिसत आहे. श्वेता आणि नव्या व्यतिरिक्त जया बच्चन (Jaya Bachchan) देखील या पॉडकास्टमध्ये सहभागी आहेत. नव्याच्या या शोची प्रेक्षकांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. नुकताच या शोच्या नवीन एपिसोडचा प्रोमो रिलीज झाला आहे ज्यामध्ये श्वेता बच्चन तिच्या आईच्या नावडत्या सवयींबद्दल बोलताना दिसत आहे.

जया यांच्या या सवयीमुळे श्वेता नाराज आहे
श्वेता बच्चन तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी प्रसिद्ध आहे. ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्ट शोमध्ये तिची मुलगी नव्याने तिला विचारले की तिच्या आजीची कोणती सवय तिला अजिबात आवडत नाही. या प्रश्नाच्या उत्तरात श्वेता म्हणाली, ‘आई जेव्हाही कांद्याचा रस केसांना लावते तेव्हा मला त्याच्या वासाने त्रास होतो. कांद्याचा वास घरभर पसरतो. आईची ही सवय मला अजिबात आवडत नाही. अशावेळी मला घर सोडून पळून बाहेर जावे वाटते.’

तसेच श्वेता बच्चन पुढे म्हणाली, ‘आई अगदी लहान मुलांसारखी झोपते. अगदी थोड्याशा आवाजानेही ती उठते.’ हे ऐकून नव्या म्हणते, ‘हो, नानी दुसऱ्या दिवसाचा विचार करतच चिंतेत राहते, म्हणूनच ती लगेच उठते.’ ‘व्हॉट द हेल नव्या’ या पॉडकास्ट शोचा हा नवीन भाग त्वचेची आणि केसांची घरीच काळजी कशी घ्यावी या विषयावर आधारित आहे. ‘ब्युटी सिक्रेट्स फॉर द एजेस’ असे या एपिसोडचे नाव आहे.

महत्वाच्या बातम्या

Nitesh Rane | पहिल्या दिवसापासून जरागेंना सांगतोय राजकीय टीका करु नका, भाजप नेते नितेश राणेंचा इशारा

Manoj Jarange Patil यांची तब्येत महत्वाची, त्यांच्या प्रकृतीला काय झाले तर जबाबदार कोण? – पृथ्वीराज चव्हाण

Devendra Fadnavis | “मला अनेकदा वाटतं अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी असं वाटतं”, देवेंद्र फडणवीस काय बोलून गेले?