A Valentine’s Day | दिग्दर्शक रोहित रावसाहेब नरसिंगे यांच्या ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ चित्रपटात झळकणार रत्नागिरी सुपुत्र फैरोज माजगावकर

प्रेम करणाऱ्यांचा खास दिवस असलेल्या ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ (A Valentine’s Day) या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित आज झाला आहे. तगडी स्टार कास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार असून,रहस्यमय आणि रंजक असा हा टीझर आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दल कुतुहुल निर्माण झाले आहे.टीझरच्या सुरुवातीलाच आश्विनी कुलकर्णी (Ashwini Kulkarni) आणि संजय खापरे (Sanjay Khapare) हे पोलिसाच्या भूमिकेत दिसत आहेत.

गोल्डन स्ट्राईप्स एंटरटेनमेंट (Golden Stripes Entertainment) एलएलपी सोबत सहयोगी अनिल एन वहाने फिल्म्स प्रोडक्शन्स आणि कियान फिल्म्स & एंटरटेनमेंट या निर्मिती संस्थेचे फैरोज अनवर माजगावकर, हुसैन निराळे, श्रीकांत सिंह आणि सह निर्मात्ये म्हणून अनिल वहाने आणि  सुनील यादव ‘अ व्हॅलेंटाईन्स डे’ (A Valentine’s Day) या चित्रपटाचे निर्मात्ये आहेत तर  रोहित रावसाहेब नरसिंगे यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटाची कथा आणि संवाद अजित दिलीप पाटील यांनी लिहिली असून पटकथा याची देखील जबाबदारी रोहित रावसाहेब नरसिंगे यांनी निभावली.अभिनेता संजय खापरे,अभिनेता सुरेश विश्वकर्मा,अभिनेता अरुण कदम,अभिनेता अभिजित चव्हाण,अभिनेता फैरोज माजगावकर,अभीनेत्री अश्विनी कुलकर्णी अशी चित्रपटाची दमदार स्टार कास्ट असून अभिनेत्री चैताली विजय चव्हाण पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसेल. साई पियुष, एलेन के पी ऊर्फ सिद्धार्थ पवार आणि निरंजन पेडगावकर हे संगीत दिग्दर्शक आहे.

टीझर मधून हा चित्रपट सीरियल किलर या विषयावर असल्याचा अंदाज येत आहे.तसंच चित्रपटात आई मुलाच प्रेम देखील दिसून येत आहे. चित्रपटाचा लुक देखील फ्रेश दिसत आहे मात्र चित्रपटाच्या कथेत काय रहस्य दडल आहे ? हे चित्रपट प्रत्यक्षात पहिल्यासच समजेल म्हणून चित्रपटाची उत्सुकता वाढत जात आहे.

महत्वाच्या बातम्या

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष शेलार…; भाजप प्रवेशानंतर बोलताना अशोक चव्हाणांकडून चूक, फडणवीसही हसून बेजार

छत्रपती शिवाजी महाराज हे बहुजन समाजाचे राजे, Chhagan Bhujbal यांचे मोठे वक्तव्य

Rajya Sabha Elections | राज्यसभेसाठी शरद पवार मास्टरस्ट्रोक मारण्याच्या तयारीत, छत्रपती शाहू महाराजांना देणार उमेदवारी!