तुमची सुरक्षा तुमच्याच हाती! संकटाकाळी फोनमधील ‘ही’ छोटीशी सेटिंग वाचवेल तुमचा जीव, महिलांनी तर अवश्य करावी!

जर तुमची आई, बहिण, बायको किंवा मैत्रीण कुणीही नाईट शिफ्ट करत असेल किंवा त्यांना घरी यायला रात्री उशीर होत असेल तर ही बातमी  नक्कीच तुमच्या कामी येणार आहे. रोज बातम्यांमध्ये वाचायला मिळणाऱ्या क्राइम न्यूज आणि रात्री एकट्या मुलीसोबत रस्त्यावर घडणारे प्रसंग तुम्ही ऐकूनच असाल. अशावेळी तुमच्या प्रियजनांच्या सेफ्टीसाठी तुम्ही काय करू शकता. तर तुम्ही तुमच्या Android किंवा आयफोनवर Emergency sos enable करु शकता.

यासाठी तुम्हाला फोनच्या सेंटिंगमध्ये जाऊन password & security हा ऑप्शन शोधायचा आहे. मग या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. मग आतमध्ये तुम्हाला Emergency sos चा ऑप्शन दिसेल, जो तुम्हाला ऑन करायचा आहे. हा ऑप्शन ऑन केल्यानंतर तिथे तुम्हाला तुमच्या जवळच्या आणि विश्वासातील ३ व्यक्तींचा फोन नंबर ऍड करायचा आहे.

यामुळे तुम्ही कधी संकटात असाल तर फोनच्या पावर बटनला ५ वेळा दाबल्यास आपोआप जवळच्या व्यक्तीला कॉल जातो आणि तुमच्या लोकेशनबद्दल माहिती जाते. याबरोबरच पोलीसांनाही आपोआप कॉल जातो आणि तुमच्या लोकेशनबद्दल माहिती जाते. ऍँड्राईड वर तर आपोआप व्हिडिओ रिकॉर्डिंगसुद्धा सुरू होते. याने तुम्ही एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवू शकता.