मुख्यमंत्रीपदासाठी अब्दुल सत्तारांची विखे पाटलांना पसंती; म्हणाले, ‘माझी छाती फाडून दाखवली तर…’

राज्यात सध्या सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मुख्यमंत्री बदलणार अशा चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अजित पवार आघाडीवर असून अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील मुख्यमंत्रीपदासाठी आपण आजही तयार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचे नाव समोर आले होते. मात्र आता या शर्यतीत आणखी काही नावे सामाविष्ट होत असून राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांचे नाव समोर आले आहे.

शिंदे गटाचे नेते व कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राधाकृष्ण विखे पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. “मित्र मोठा व्हावा असं कोणाला वाटत नाही? विखे पाटील यांनी मुख्यमंत्री पदापेक्षाही मोठं व्हावं. मी जर हनुमानासारखा मोठा भक्त असतो, तर माझी छाती फाडून दाखवलं असतं की, माझ्या हृदयात विखे पाटीलच आहेत,” असे वक्तव्य यावेळी अब्दुल सत्तार यांनी केले आहे.