सत्तारांनी ज्या घरात मुक्काम केला, तिथं रात्री पाणी गळत होतं; सकाळी कृषीमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

अमरावती – कृषीमंत्री (Agriculture ministers) अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी बुधवारी रात्री एका शेतकऱ्याच्या (Farmers) घरी अगदी साधेपणाने मुक्काम केला. तिथेच जेवणही केलं. पण रात्रीच्या वेळी पावसाच्या पाण्याने हे घर गळत होते. शेतकऱ्याच्या घराची अशी अवस्था त्यांना पहावली नाही. सत्तारांनी तत्काळ… माझ्याकडून या दोन्ही शेतकऱ्यांना चांगली घरं बांधून मिळतील, असं आश्वासन दिलं.

मेळघाटमधील साद्राबाडी गावातील चुन्नीलाल पटेल यांच्या घरी अब्दुल सत्तारांनी येथेच्छ पाहुणचार घेतला. तर सुनील धांडे यांच्या घरी मुक्काम केला. शैलेंद्र सावलकर यांच्याही घरी त्यांनी भेट दिली. सुनील धांडे आणि शैलेंद्र सावलकर यांची घरं रात्री गळत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांना माझ्याकडून घरं बांधून देणार, असं आश्वासन सत्तारांनी दिलं. आज त्याचं भूमीपूजनही होणार आहे. त्यांच्या मुलीच्या लग्नाला देखील येणार असल्याचं सत्तारांनी सांगितलं.