बाबो! ‘हे’ आहे पृथ्वीवरील सर्वात घातक फूल, वासानेच माणूस होतो बेशुद्ध; फूल खाल्यास…

आपल्या जीवनात फुलांचे (Flowers) वेगळे महत्त्व आहे. पूजेपासून सजावटीपर्यंत फुलांचा वापर केला जातो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, फुले देखील कोणाचा जीव घेऊ शकतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका फुलाबद्दल सांगणार आहोत, ज्यापासून तुम्हाला खूप सावध राहण्याची गरज आहे. या फुलाचा वास घेतला तरी तुम्ही बेशुद्ध व्हाल.

घरे सजवण्यासाठी लोक फुलांचा वापर करतात. लग्नात फुलांनी मंडप सजवला जातो आणि पूजेतही फुले वापरली जातात. परंतु तुम्ही कधी अशा फुलाबद्दल ऐकले आहे किंवा असे फूल पाहिले आहे का, जे मानवासाठी धोकादायक आहे? चला तर मग, असे कोणते फूल आहे जे मानवांसाठी धोक्याचे (Dangerous Flower For Human) आहे.

हे फूल इतके धोकादायक आहे की त्याच्या आजूबाजूला गवतही उगवत नाही. या फुलाचे नाव एकोनाइट (Aconite Flower) आहे. हे त्याचे इंग्रजी नाव आहे. मराठीत त्याला ‘गोड विष’ म्हणतात. हे फूल सहजासहजी मिळत नाही. हे हिमालयाच्या पठारात सुमारे 10000 फूट उंचीवर आढळते. हे फूल हिमालय पर्वतावरील नामिक आणि हिरामणी हिमनद्यांभोवती आढळते. त्यावर जुलै आणि ऑगस्टमध्ये निळ्या रंगाची फुले येतात. या फुलाचा उपयोग औषध बनवण्यासाठी केला जातो. ही वनस्पती एक अँजिओस्पर्मिक वनस्पती आहे म्हणजे अशी वनस्पती ज्यामध्ये मुळे, फांद्या, पाने, फळ, फूल, बिया असतात.

या फुलापासून मधुमेह, लकवा यांसारख्या आजारांवर औषधे तयार केली (Aconite Flower Use) जातात. मात्र या फुलापासून औषध बनवण्याची एक विशेष प्रक्रिया आहे. त्यानुसारच रुग्ण त्याचे सेवन करु शकतो. या फुलाच्या आजूबाजूला दुसरी कोणतीही वनस्पती उगवत नाही यावरून ते किती धोकादायक आहे, याचा अंदाज येतो. दुसरीकडे, तज्ञ म्हणतात की जर एखाद्या प्राण्याने त्याची पाने खाल्ली तर तो लगेच मरतो.