शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना सुप्रिया सुळेंचं रोखठोक उत्तर, म्हणाल्या…

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात अजित पवार (Ajit Pawar) यांनी भूकंप घडवून आणला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार विरुद्ध शरद पवार (Sharad Pawar)यांच्यामधला संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यामुळे पक्षात उभी फूट पडली आहे. नेमका कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा? याबाबत कार्यकर्त्यांमध्ये देखील संभ्रम असल्याचं चित्र आहे. दरम्यान,शरद पवार ज्या वैचारिक भूमिकेची मांडणी करत होते ती एवढी कमकुवत आहे का असा सवाल उपस्थित होत असून अजित पवारांचे बंड म्हणजे शरद पवारांचा वैचारिक पराभव असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा होता. आज राष्ट्रवादीतील दोन्ही गटाचे मेळावे झाले यात दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आपली भूमिका कार्यकर्ते आणि नेत्यांच्या समोर मांडली. यावेळी आपल्या जबरदस्त भाषणात अजित यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली.

आपल्या भाषणात ते म्हणाले, गेली अनेक वर्षे तुम्ही राजकारण करत आहे. आता 80 वर्षाचे झाले. नवीन नेतृत्वाला संधी मिळाली पाहिजे.  आता तुमचे वय झाले आहेत. तुम्ही कधी थांबणार आहे की नाही? असा थेट सवाल त्यांनी शरद पवारांना केला. यावेळी सभेमध्ये अजित पवार यांचे मोठे स्फोट अनेक पक्षात 75 वर्षात रिटायर होतात. 2017 मध्येच आम्हाला भाजपमध्ये जाण्यास सांगितले होते. 2019 मध्ये शपथविधी साठी वरिष्ठांनी सांगितले होते प्रत्येक वेळी मलाच विलन करण्यात आले अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली.

शरद पवारांचं वय काढणाऱ्या अजित पवारांना आता सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) रोखठोक उत्तर दिलं आहे. काही लोकांचं वय झालं त्यामुळे त्यांनी फक्त आशीर्वाद द्यावेत असं काही लोकांचं म्हणणं आहे. पण का बरं आशीर्वाद द्यावेत? रतन टाटा साहेबांपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत. आजही टाटा ग्रुप पोटतिडकीने लढतात. देशात टाटा ग्रुप हा सर्वात मोठा ग्रुप आहे. रतन टाटांचं वय 86 आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे साइरस पूनावाला यांचं वय 84, अमिताभ बच्चन 82, वॉरेन बफेट, फारूख अब्दुला साहेबांपेक्षा 3 वर्षांनी मोठे आहेत. वय हा फक्त आकडा आहे, जिद्द पाहिजे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.