बोंडारवाडी प्रकल्पासह कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास राज्य शासनाची मान्यता

टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुप्रमास लवकरच मान्यता आमदार अनिल बाबर यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश

Krishna Project: बोंडारवाडी प्रकल्पासह सातारा जिल्ह्यातील कृष्णा प्रकल्पाच्या फेरजलनियोजनास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. त्यासंदर्भात ३० सप्टेंबर रोजी सुधारित शासन निर्णय देखील जाहिर करण्यात आला आहे. आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांनी याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

दरम्यान, आज वर्षा निवासस्थानी आमदार बाबर यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली त्यावेळी शासन निर्णयाची प्रत मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार बाबर यांना दिली. दरम्यान, टेंभू योजनेच्या तिसऱ्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडण्यात येईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार बाबर यांना सांगितले.

दुष्काळी खानापूर आटपाडी व विसापूर सर्कल तासगाव तालुक्यातील ३४ गावातील शेतकऱ्यांना टेंभू योजनेचे हक्काचे पाणी मिळावे, यासाठी आमदार बाबर पाठपुरावा करीत करीत आहेत. टेंभू विस्तारीत योजनेसाठी आठ टी. एम. सी.पाणी उपलब्ध करुन देण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-
रोहित पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्त महाविद्यालात होणार चक्क लावणीचा कार्यक्रम?

बाराही महिने चालणारे व्यवसाय, दर महिन्याला तगडी कमाई करुन देऊ शकतात ‘हे’ व्यवसाय

Bed Bugs: ढेकणांना त्रासलाय? ‘हे’ घरगुती उपाय करुन एका दिवसात पळवून लावा ढेकूण