ठाण्यापाठोपाठ आता नवी मुंबईतही ठाकरेंना धक्का, अनेक नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर 

नवी मुंबई –  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर आता शिवसेनेत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटात सध्या बराच संघर्ष सुरू असून मोठ्याप्रमाणात शिवसैनिक हे द्विधा मनस्थितीत आहेत. स्व. बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या विचारांच्या वारसदाराला साथ द्यावी की रक्ताच्या वारसदाराला मदत करावी असा यक्षप्रश्न सध्या सेनेच्या कार्यकर्त्यांच्या पुढे आहे. अनेकांनी विनंती करून देखील उद्धव ठाकरे हे कॉंग्रेस – राष्ट्रवादीची (Congress – Nationalist Congress) साथ सोडायला तयार नसल्याने नेते मंडळी शिवसेनेला राम राम ठोकत आहेत असं चित्र सध्या दिसत आहे.

दरम्यान, आधी आमदारांनी बंड करत सरकार पाडलं तर आता नगरसेवक आणि अनेक पदाधिकारी हे शिंदे गटाची (Cm Eknath Shinde) वाट धरताना पाहायला मिळत आहेत. आधी नागपुरातील पदाधिकारी शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्या आल्या. मग ठाण्यातल्या नगरसेवकांनी (Shivsena Corporators) ठाकरेंना धक्का देत शिंदे गटाची वाट धरली. त्यापाठोपाठ आता नवी मुंबईतील तब्बल 20 ते 25 नगरसेवक हे शिंदे गटाच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे.

नवी मुंबईतील गटनेते विजय नहाटा (Vijay Nahata) व शिवसेनेचे मोठे नेते विजय चौगुले (Vijay Chowgule) यांनी शिंदे गटाला पहिल्यापासूनच समर्थन दिले आहे. त्यामुळे ते शिंदे गटात जातील अशी शक्यता आहे. ते  गेल्याने त्यांच्यासोबत असणारे माजी 20 नगरसेवक देखील शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. बेलापूर (Belapur) विधानसभेमधून शिवसेनेच्या तिकटावर विजय नाहाटा लढले होते. त्यामुळे ते देखील एकनाथ शिंदे यांना मानणारे आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील शिवसैनिक हे शिंदे गटाच्या वाटेवरती असल्याच्या चर्चा आहेत.