एअरटेलचा धमाका! ‘या’ दोन प्रीपेड प्लान्समुळे होतेय ग्राहकांची चांदी; 60GB पर्यंत डेटा मिळतोय

एअरटेलने दोन नवीन प्रीपेड प्लॅन लॉन्च केले आहेत. या प्लॅनसह, कंपनी 30 दिवसांच्या वैधतेसह 60GB पर्यंत डेटा देत आहे. याशिवाय यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगसोबत दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात. याशिवाय यूजर्सना इतर फायदेही मिळतात.

प्रीपेड एअरटेल वापरकर्त्यांना विंक म्युझिक, हॅलो ट्यून्स, FASTag वर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि इतर फायदे मोफत मिळतात. दोन्ही प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे. याशिवाय, कंपनी 301 रुपयांच्या अॅड-ऑन प्लॅनसह 50GB डेटा देखील ऑफर करते.

एअरटेलचा 489 रुपयांचा वॉल प्रीपेड प्लान 50GB डेटासह येतो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल/एसटीडी व्हॉईस कॉलिंगची सुविधाही देण्यात आली आहे. याशिवाय यूजर्सला दररोज १०० एसएमएस देखील दिले जातात. या प्लॅनची वैधता ३० दिवसांची आहे.

वापरकर्त्यांना विंक म्युझिक, मोफत हॅलो ट्यून, FASTag वर १०० रुपयांचा कॅशबॅक आणि अपोलो 24/7 सर्कल फायद्यांसह एअरटेल थँक्स फायद्यांचा विनामूल्य प्रवेश देखील मिळतो. दुसऱ्या प्लानची वैधता देखील ३० दिवसांची आहे.

दुसऱ्या बाजूला एअरटेलचा ५०९ रुपयांचा प्रीपेड प्लान देखील ३० दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये कंपनी 489 रुपयांच्या प्लॅनचे फायदे देते. याशिवाय यूजर्सना अतिरिक्त 10GB डेटा देखील दिला जातो. म्हणजेच या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 60GB डेटा मिळतो. कंपनीच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये यूजर्सला एका महिन्यासाठी अमर्यादित व्हॉईस कॉल्स आणि दररोज १०० एसएमएस दिले जातात. विंक म्युझिक, फ्री हॅलो ट्यून, FASTag वर 100 रुपये कॅशबॅक, अपोलो 24/7 सर्कल आणि एअरटेल थँक्स फायदे देखील या प्लॅनमध्ये दिले आहेत.