Kishore Jorgewar | धर्मदाय रुग्णालयातील 10 टक्के खाटा राहणार गरीब – गरजू रुग्णांसाठी आरक्षित

Kishore Jorgewar | गरजु रुग्णांवर उपचार करण्यासाठी धर्मदाय रुग्णालयात 10 टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून आरक्षित खाट निर्धन व दुर्बल घटकातील रुग्णांना पारदर्शक पध्दतीने उपलब्ध करुन देण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय समीतीवर आमदार किशोर जोरगेवार (Kishore Jorgewar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

निर्धन व दुर्बल घटकांतील रुग्णांवर मोफत व सवलतीच्या दराने वैद्यकीय उपचार होण्यासाठी योजना तयार करण्यात आली असून त्यानुसार प्रत्येक धर्मादाय रुग्णालयाने त्यांच्या रुग्णालयातील एकूण कार्यान्वीत खाटांपैकी १० टक्के खाटा निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी व १० टक्के खाटा दुर्बल घटकांतील रुग्णांवर सवलतीच्या दराने उपचार करण्यासाठी राखून ठेवणे या रुग्णालयांना बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे आता शासकीय रुग्णालयासह धर्मादाय रुग्णालयातही गरजू रुग्णांवर निशुल्क उपचार होणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुण्यात मुरलीधर अण्णांचाच विजय पक्का? ‘हे’ फॅक्टर्स मिळवून देणार त्यांना महाविजय?

Sharad Pawar | मोदी साहेब माझ्या बोटाला हात लावू नका, शरद पवारांचा पंतप्रधानांना इशारा

Amol Kolhe | जे सरकार शिवाजी महाराजांच्या पहिल्या राजधानीच्या नावाने नामकरण करतं, ते सरकार त्यांचे आदर्श पाळते का?