आमदारांनी तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान…; पवारांवरील वक्तव्यावरुन फडणवीसांनी टोचले पडळकरांचे कान

Gopichand Padalkar On Ajit Pawar: भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) उपमुख्यमंत्री अजित पवारांवर (Ajit Pawar) टीका करताना त्यांना ‘लांडग्याचं पिल्लू’ असं म्हटलं आहे. गोपीचंद पडळकर यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून धनगर समाजाच्या (Dhanagar Samaj) मागण्यांकडे लक्ष वेधले. याबाबत पत्रकारांनी त्यांना तुम्ही अजित पवारांना पत्र का पाठवलं नाही? असा प्रश्न विचारला असता पडळकर यांनी ‘अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे’ असं म्हटलं आहे.

अजित पवार भाजपसोबत सत्तेत असताना गोपीचंद पडळकरांनी त्यांच्यावर बोचरी टीका केल्याने महायुतीत वाद होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. अशातच आता देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गोपीचंद पडळकरांचा समाचार घेतला आहे.

मला असं वाटतं की, गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य अयोग्य आहे. अशाप्रकारचं वक्तव्य त्यांनी करणं हे चुकीचं आहे, तिन्ही पक्षातील नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि आमदारांनी तिन्ही पक्षातील नेत्यांचा सन्मान ठेवला पाहिजे. अशाप्रकारच्या भाषेचा बिलकुल उपयोग करू नये, असे माझं स्पष्ट मत आहे, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. या माध्यमातून फडणवीसांनी पडळकरांचे कान टोचले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-
Video : मोहम्मद सिराज नव्हे, तर रोहित शर्माने आशिया चषक दुसऱ्याच खेळाडूकडे सोपवला
फायनलमध्ये अशी कामगिरी करणे तुमची मानसिक ताकद दर्शवते; कर्णधार रोहितचा आनंद गगनात मावेना
अभिनेत्री Zareen Khan विरोधात अटक वॉरंट; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण