सीतेला धुम्रपान करताना दाखवले, पुणे विद्यापीठात रामायणावरुन राडा; विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल

Pune SPPU News: पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) ललित कला केंद्रात (Lalit Kala Kendra) ‘बिहाइंड द स्क्रीन लाइफ ऑफ द ॲक्टर्स प्लेइंग रामलीला’ हा कार्यक्रम रंगला. मात्र स्टेजिंगदरम्यानच अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) आणि नाटक सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या नाटकात माता सीतेशी संबंधित अनेक आक्षेपार्ह संवाद आणि दृश्ये असल्याचा आरोप अभाविपने केला आहे.

वाद वाढत गेल्याने प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. त्यानंतर रामलीलावर आधारित नाटक करून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी विद्यापीठातील प्राध्यापक आणि ५ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली आहे.

नाटकातील पात्र सिगारेट ओढत होते आणि स्टेजवर शिवीगाळ करत होते.
एफआयआरनुसार, नाटकात सीतेची भूमिका करणारी विद्यार्थीनीला सिगारेट ओढताना आणि अपशब्द वापरताना दाखवण्यात आले होते. यावेळी उपस्थित अभाविपच्या कार्यकर्त्यांनी नाटकावर आक्षेप घेत कार्यक्रम थांबवला तेव्हा कलाकारांनी त्यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यास सुरुवात केली. कलाकारांनी सांगितले की, रामलीला वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या कलाकारांच्या बॅक स्टेजवर आधारित होती.

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल
उपनिरीक्षक अंकुश चिंतामण यांनी सांगितले की, अभाविपचे अधिकारी हर्षवर्धन हारपुडे यांच्या तक्रारीच्या आधारे, भारतीय दंड संहितेच्या कलम २९५ (ए) नुसार, मुद्दाम आणि दुर्भावनापूर्ण हेतूने कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि इतर तरतुदी आहेत. अटक करण्यात आलेल्यांमध्ये ललित कला केंद्राचे संचालक डॉ. प्रवीण भोळे, विद्यार्थी भावेश पाटील, जय पेडणेकर, प्रथमेश सावंत, हृषिकेश दळवी आणि यश चिखले यांचा समावेश आहे.

महत्वाच्या बातम्या –

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पुणे शहरात मेट्रोच्या कामामुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना यांना निवेदन देणार – गोऱ्हे

Rishabh Pant | ‘खोलीत जाऊन खूप रडायचो…’, धोनीशी होणाऱ्या तुलनेवर ऋषभ पंतचा धक्कादायक खुलासा

ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे