मानवाला सिग्नल्स पाठवतायेत Aliens, 2023मध्ये पृथ्वीवर उतरु शकतात UFO; जाणून घ्या या दाव्यांमागील सत्य

आतापर्यंत पृथ्वीच्या वेगवेगळ्या भागांवर एलियन (Aliens) किंवा यूएफओ (UFO) पाहिल्याचा दावा करण्यात आला आहे. आता या दाव्यांच्या आधारे नवा दावा समोर आला आहे. असे म्हटले जात आहे की, 2023 हे वर्ष आहे जेव्हा एलियन्स शेवटी पृथ्वीवर (Aliens on Earth) उतरतील. लंडन, लास वेगास आणि ब्राझीलमध्ये यूएफओ पाहिल्याचा दावा वेगवेगळ्या लोकांनी केला आहे. मात्र, या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, हे सांगणे कठीण आहे. आतापर्यंत जगात एलियन्सशी संबंधित कोणत्याही दाव्याची पुष्टी झालेली नाही. पण ‘यूएफओ हंटर’ मॅट वेल्स म्हणतात ‘एलियन्स आम्हाला मेसेज पाठवत आहेत’.

डेलीस्टारच्या वृत्तानुसार, वेल्स म्हणाले, ‘मला विश्वास आहे की एलियन्स आपण विचार करण्यापेक्षा खूप लवकर पृथ्वीवर येताना पाहू शकतो.’ लास वेगास, पॅरिसमधील आयफेल टॉवर, ब्राझील, चिली आणि जपानच्या आकाशात काही ‘असामान्य घटना’ पाहिल्या आहेत. त्याबद्दल मॅट म्हणतो, ‘जगातील काही प्रसिद्ध ठिकाणी या घटना सतत पाहिल्या जात आहेत आणि नोंदवल्या जात आहेत.’

2023 मध्ये एलियन्स येणार असल्याचा दावा
मोठ्या संख्येने UFO हंटिंग ग्रुप्स, ज्यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही, त्याच गोष्टीची तक्रार करत आहेत. तथापि, मॅटकडे त्याच्या दाव्यांचे समर्थन करण्यासाठी कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत. पण असे दावे करणारा तो एकमेव नाही. एथोस सालोम नावाच्या ‘स्वयंघोषित संदेष्ट्या’नेही असाच दावा केला होता. सालोमने म्हटले होते की, अमेरिकेच्या टॉप-सिक्रेट एरिया 51 हवाई तळावर असलेल्या भूमिगत पोर्टलमधून एलियन बाहेर येत आहेत.

‘आजचा नॉस्ट्राडेमस’ कितपत खरा आहे?
36 वर्षीय एथोस सालोम यांना ‘आजचा नॉस्ट्राडेमस’ म्हटले जाते. सालोमचे अनेक अंदाज खरेही ठरले आहेत. कोरोना महामारी असो किंवा ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे निधन असो, अनेक जागतिक घडामोडी त्यांनी आधीच सांगितल्या होत्या. युक्रेन युद्धाचे भाकीतही एथोस सालोम यांनी केले होते. यूएस स्पेस एजन्सी नासाने जूनमध्ये घोषणा केली की, ते यूएफओवर पहिला अभ्यास सुरू करत आहे.