अल्लाह तिला बक्षीस देईल; अल कायदाच्या प्रमुखाकडून हिजाब समर्थक मुस्कानचे कौतुक 

नवी दिल्ली-  कर्नाटकातील विद्यार्थिनी मुस्कान खान ही हिजाब प्रकरणामुळे चर्चेत आली होती. मुस्कानने हिजाबचे समर्थन करत ८ फेब्रुवारी रोजी ‘अल्लाहू अकबर’चा नारा दिला होता. आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली असून अल-कायदाचा प्रमुख अयमान अल जवाहिरी ( Al Qaeda chief Ayman Al Zawahiri ) याने तिचे कौतुक केले आहे.

‘हुरत-उल-हिंद’ (भारताची नोबल वुमन) शीर्षक असलेले जवाहिरीचे व्हिडिओ भाषण ( Zawahiri video on India and hijab ) व्हायरल झाले आहे.भारतामधील मुस्कानने मुस्लिम आणि गैर-मुस्लिम यांच्यातील संघर्षाचे खरे चित्र समोर कसे आणले, याचा जवाहिरीने व्हिडिओमध्ये ( Muskan Khan hijab video ) उल्लेख केला आहे.

जिहादच्या भावनेला आणखी बळ देत मुस्लिमांना जागृत केल्याचे म्हटले आहे. अधोगती झालेल्या पाश्चात्य जगाच्या तुलनेत न्यूनगंडाने ग्रासलेल्या मुस्लिम भगिनीने त्यांना व्यावहारिक धडा शिकवल्याबद्दल अल्लाह तिला खूप बक्षीस देईल, असे जवाहिरी व्हिडिओमध्ये म्हणतो.