माझी साडी खेचली, छातीवर पंच मारला; केतकी चितळेकडून विनयभंगाचा आरोप

मुंबई – अभिनेत्री केतकी चितळे (Ketaki Chitale) गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारी केतकी चितळे तब्बल ४१ दिवस जेलमध्ये होती, जामीन मिळाल्यानंतर केतकी चितळेची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

केतकी चितळेने एका मुलाखतीत हल्ला करणाऱ्यांवर गंभीर आरोप केले. ‘मला बेकायदेशीररित्या घरातून नेण्यात आले. बेकायदेशिररित्या अरेस्ट वॉरंट आणि नोटीस शिवाय जेलमध्ये टाकण्यात आले. मला अर्ध्या तासाचीही नोटीस दिली गेली नाही, थेट पोलीस घरी आले आणि मला उचलून घेऊन गेले. हा देखील गुन्हाच आहे.’ असं तिने म्हटले आहे.

एनसीपीच्या काही महिलांकडून आणि जमावाकडून मारहाण झाल्याचा आरोपही केतकीने केला आहे. अभिनेत्री याविषयी बोलताना म्हणाली की, माझ्या कानाखाली मारण्यात आलं, डोक्यात कुणीतरी जोरात टपली मारली आणि राइट ब्रेस्टवर पंच मारल्याचा आरोपही तिने केलाय.

मी साडी नेसली होते. कुणीतरी धक्का दिला, पायात पाय घातल्यामुळे मी पोलिसांच्या गाडीत पडले. साडी देखील खेचण्यात आली. माझा पदर पडला होता, साडी वर गेली होती, माझा विनयभंग झाला…. इतके होऊनही अंगावर केमिकल रंग आणि अंडीदेखील फेकण्यात आले.असं देखील तिने सांगितले.