Sandeep Deshpande | राजसाहेब पक्षहिताचा निर्णय घेतील, राज ठाकरेंच्या दिल्लीवारीवर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया

Sandeep Deshpande | लोकसभा निवडणूक २०२४ (Lok Sabha Election 2024) पूर्वी राज्यात आणखी एका पक्षाची युती पाहायला मिळू शकते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थातच मनसे भाजपाशी हात मिळवू शकते, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. अशातच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेण्यासाठी दिल्लीला पोहोचल्याने या चर्चांनी जोर धरला आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज ठाकरे दिल्लीला का गेलेत? हे काही तासांतच स्पष्ट होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी सांगितलं की, राज ठाकरे जो निर्णय घेतील तो हिंदुत्वाचा, महाराष्ट्राचा आणि पक्षाच्या हिताचा असेल. बाळा नांदगावकर आमचे ज्येष्ठ नेते आहेत. ते दिल्लीत गेलेत तर आम्हाला आनंद होईल, अशी प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे.

संदीप देशपांडे म्हणाले की, आम्हाला राज ठाकरे जो आदेश देतील त्यानुसार आम्ही काम करू. कधी यश आलं तर कधी अपयश आलं, पण ते खचून गेले नाहीत. महाराष्ट्राच्या राजकारणात चिखल झालाय, हे खरं आहे असंही ते म्हणाले. राज ठाकरे हित बघून निर्णय घेतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | घर फुटलं खूप वाईट वाटतंय, श्रीनिवास पवार यांच्यानंतर बड्या नेत्याचा अजित पवारांना टोला

Shrinivas Pawar | पवार नाव संपवण्यासाठी भाजपाने ही चाल खेळली, श्रीनिवास पवार यांनी भाजपावर केली खोचक टीका

Chandrasekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते, बावनकुळे यांची टीका