उदयपूर मर्डर केस : आरोपींना कोर्ट परिसरात जमावाने बेदम मारहाण केली

उदयपूर – उदयपूरमध्ये कन्हैया लालच्या हत्येतील (murder of Kanhaiya Lal) चार आरोपींना (four accused) न्यायालयाबाहेर लोकांनी बेदम मारहाण (Beating) केली. मिळालेल्या माहितीनुसार, चार आरोपींना राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) न्यायालयात हजर केल्यानंतर ही घटना घडली. न्यायालयातून बाहेर काढत असताना जमावाने आरोपींना बेदम मारहाण केली.

यावेळी पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रचंड गर्दीतून चारही आरोपींना पोलिस व्हॅनमधून तुरुंगात पाठवण्यात आले. यापूर्वी एनआयए (NIA) न्यायालयाने या हत्याकांडातील आरोपींना १२ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे. उदयपूर हत्याकांडातील (Udaipur massacre) आरोपी रियाझ, मो. गौस, मोहसीन आणि आरिफ यांना 12 जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.

एनआयएने उदयपूर हत्याकांडातील आरोपींना शनिवारीच ताब्यात घेतले होते. या घटनेतील दोन्ही मुख्य आरोपींना अजमेरच्या उच्च सुरक्षा तुरुंगातून जयपूरला आणून एनआयए न्यायालयात हजर करण्यात आले. राजस्थानमधील उदयपूरमध्ये कन्हैया लाल यांच्या दुकानात भरदिवसा दोघांनी कन्हैया  यांची हत्या केली होती.
भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा (Suspended BJP spokesperson Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर कथितपणे पोस्ट केल्याप्रकरणी ही हत्या करण्यात आली. या घटनेनंतरच दोन्ही आरोपींना पोलिसांनी पकडले. या घटनेनंतर राज्यात पसरलेले तणावाचे वातावरण पाहता राजस्थान सरकारने एका महिन्यासाठी कलम 144 लागू केले होते.