Ambani Salary: आकाश, ईशा आणि अनंत अंबानी कोणताही पगार घेणार नाहीत

Akash, Isha, Anant Ambani Salary: भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) सलग तीन वर्षांपासून कोणत्याही प्रकारचा पगार घेत नाहीत. आता त्यांच्या तीन मुलांनीही तोच मार्ग स्वीकारला आहे. आज बातमी आली आहे की अंबानी कुटुंबाचे तीन वारस म्हणजेच आकाश अंबानी, ईशा अंबानी आणि अनंत अंबानी कोणताही पगार घेणार नाहीत. त्यांना फक्त संचालक मंडळ आणि समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी शुल्क दिले जाईल. रिलायन्स इंडस्ट्रीजने (Reliance Industries) या तिघांच्या नियुक्तीवर भागधारकांची मंजुरी घेण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावात ही माहिती दिली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी आर्थिक वर्ष 2020-21 पासून कोणतेही वेतन घेत नाहीत.

रिलायन्स इंडस्ट्रीजने आता आपल्या शेअरहोल्डर्सना पोस्टाद्वारे पत्र पाठवले असून, या तिघांच्या नियुक्तीसाठी त्यांची मंजुरी मागितली आहे. नवीन संचालकांना संचालक मंडळाच्या किंवा समित्यांच्या बैठकांना उपस्थित राहण्यासाठी शुल्क म्हणून पैसे दिले जातील, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

28 ऑगस्ट रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी त्यांची तीन मुले आकाश, ईशा आणि अनंत अंबानी यांचा RIL च्या वार्षिक एजीएममध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या संचालक मंडळात समावेश केला. कंपनीच्या संचालक मंडळात त्यांची दोन मुले – आकाश आणि अनंत आणि मुलगी ईशा यांचा समावेश वार्षिक सर्वसाधारण सभेत म्हणजेच ऑगस्टमध्ये झालेल्या रिलायन्स एजीएममध्ये जाहीर करण्यात आला आहे.

आकाश अंबानी रिलायन्सच्या टेलिकॉम बिझनेस जिओचे प्रमुख आहेत. ईशा अंबानी रिलायन्सच्या रिटेल व्यवसाय रिलायन्स रिटेल व्हेंचर्सची जबाबदारी घेत आहे. तर त्यांचे भाऊ अनंत अंबानी यांचा रिलायन्सचा ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा व्यवसाय आहे. मुकेश अंबानी यांनी त्यांच्या उत्तराधिकार योजनेनुसार व्यवसायाचे वेगवेगळे विभाग त्यांच्या सर्व मुलांमध्ये विभागले आहेत. मात्र, ते पुढील पाच वर्षे कंपनीचे अध्यक्ष राहतील आणि मुलांना मार्गदर्शन करतील.

https://www.youtube.com/shorts/LLrVrVQpCd4

महत्त्वाच्या बातम्या-

“महिला आरक्षणावरील पंतप्रधानांचे वक्तव्य चुकीचे, कॉंग्रेसच्या काळातच महिलांना संधी दिली गेली”

सातारा जिल्हाध्यक्षपदी संजीवराजे नाईक निंबाळकर यांची नियुक्ती; अजित पवार यांनी दिले नियुक्तीपत्र…

Shivsena : ठाकरेंची साथ सोडत मातब्बर नेत्यांनी केला शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश