‘रगील’ गावातल्या प्रेमत्रिकोणाची गोष्ट

१७ फेब्रुवारीला 'रगील' संपूर्ण महाराष्ट्रात

प्रत्येक मुलीनं रगील व्हावं असा विचार मांडणाऱ्या रगील या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. योगेश-राकेश यांनी लेखन आणि दिग्दर्शित केलेला हा चित्रपट १७ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

देवा प्रॉडक्शन निर्मित दीपक आहेर यांनी ‘रगील’ या चित्रपटाची निर्मिती केली असून नीता दीपक आहेर, बाबूशेठ आहेर, सुषमा बाळासाहेब पवार, आशालता मरकड, दीपाली योगेश चौधरी, हर्षदा राकेश पंदारे यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. रॉम-कॉम प्रकारातील या चित्रपटात ग्रामीण भागातील एक प्रेमकथा मांडण्यात आली आहे. शिवानी कथले, प्रशांत बोदगिरे, प्रणव रावराणे, अर्णव आहेर, श्लोक तेजस कुऱ्हाडे, दीपक आहेर, प्रेमाकिरण भट, अक्षय गवस, सुदर्शन बोडके आदींच्या प्रमुख भूमिका आहेत. विशाल दाते, दिगंबर सोनावणे, राहुल सूर्यवंशी यांनी लिहिलेल्या गीतांना वैभव लोंढे यांचे संगीत असून आदर्श शिंदे, बेला शेंडे, हर्षवर्धन वावरे, वैभव लोंढे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

गावातल्या प्रेमत्रिकोणाची गोष्ट मांडतानाच मुलींनी सक्षम व्हावं, प्रत्येक पालकानं आपल्या मुलांना चांगले संस्कार देणं हा विचारही या चित्रपटातून मांडण्यात आला आहे.