‘शिवसृष्टी’च्या प्रथम चरणाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी अमित शाह पुण्यात येणार

पुणे :- पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण, शिवशाहीर स्व. बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून अत्याधुनिक तंत्राचा उपयोग करून आंबेगाव, पुणे येथे उभारण्यात येत असलेल्या ‘शिवसृष्टी’ च्या प्रथम चरणाचा लोकार्पण सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या शुभहस्ते रविवार, दि. 19 फेब्रुवारी 2023 रोजी  शिवसृष्टी, आंबेगाव, पुणे येथे होणार आहे.

शिवरायांचा जीवनप्रवास पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यातून मराठा साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचे पुन्हा दर्शन घडेल या उद्देशाने शिवसृष्टीची निर्मिती करण्यात आली आहे. यावेळी, अमित शाह हे शिवसृष्टी प्रकल्पाची पाहणी करणार आहेत. या लोकार्पण सोहळ्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव, राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले उपस्थित राहणार आहेत.

https://twitter.com/ShivsrushtiP/status/1623594004159029249?s=20&t=G3w1yjJsD6t9a529gRQ1pQ