“मी सदैव तुझ्यासोबत आहे”, आदिल खानच्या छळानंतर राखी सावंतच्या पहिल्या पतीचं मोठं वक्तव्य

मुंबई- बॉलीवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतचा (Rakhi Sawant) पती आदिल खान दुर्रानीविरोधात (Adil Khan Durrani) तक्रार दाखल केल्यानंतर त्याला मुंबईतील ओशिवरा पोलिसांनी ताब्यात घेतले होते. अभिनेत्रीच्या तक्रारीवरून मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी आदिल खानवर ही कारवाई केली होती. त्यानंतर आदिलला अंधेरी कोर्टामध्ये हजर करण्यात आलं. आता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अशातच राखी सावंतचा पहिला पती (Rakhi Sawant Ex Husband) रितेश राज (Ritesh Raj) याने सध्या राखीच्या आयुष्यात सुरू असलेल्या सर्व गोंधळावर प्रतिक्रिया दिली आहे.

जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप 👉🏻 https://chat.whatsapp.com/D3xA3iJHF0r1kodPsu0Q4H

रितेशला राखीची अवस्था पाहावली नाही. तो इंस्टाग्रामवर लाइव्ह आला होता आणि यावेळी त्याने राखीला पाठींबा दर्शवला आहे. मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा राहीन, असे तो यावेळी बोलला आहे.

“राखी खूप छान मुलगी आहे. राखी खरं बोलत आहे. राखी आज आदिलबद्दल जे काही सर्वांसमोर सांगत आहे, ते तिनं मला तीन महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. राखी मी तुझ्यासोबत आहे आणि सदैव असेन. आज तू ज्या वेदनेत आहेस, त्या वेदना मलाही एकेकाळी झाल्या होत्या. माझ्या आई-वडिलांनंतर माझ्यावर जर कोणी सर्वात जास्त प्रेम केले असेल तर ती फक्त राखीच होती”, असे रितेश राज म्हणाला.

रितेशने पुढे सांगितले की, “ज्या दिवशी राखीच्या आईचं निधन झालं, त्याच दिवशी ती माझ्या स्वप्नात आली होती. त्यांनी मला एका वेळी एक गोष्ट सांगितली. त्यांनी मला नेहमी राखीला सपोर्ट करायला सांगितलं. म्हणूनच राखी मी सदैव तुझ्यासोबत आहे. राखी मी तुझ्याबरोबर काहीही वाईट केलं नव्हतं. तुला त्रास दिला नव्हता. मी तुझ्या आईवर दोन वर्षे उपचार केले. मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. जिथे तुला माझी गरज पडेल, तिथे मी असेन.”