Amravati Lok Sabha 2024 | अमरावतीमध्य्ये नवनीत राणांविरोधात बच्चू कडूं कडून उमेदवाराची घोषणा

भाजपकडून खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज अखेर अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha 2024) मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे नवनीत राणा या भाजपच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. भाजपने याआधी दोन टप्प्यात उमेदवार जाहीर केले होते. पहिल्या यादीत 20 उमेदवारांची नावे होती. तर दुसऱ्या यादीत तीन उमेदवारांची नावे होती. आता तिसऱ्या यादीत नवनीत राणा यांचं एकमेव नाव आहे. दरम्यान, आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी नवनीत राणा (Navneet Rana) यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत.

आज बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडून नवनीत राणांविरोधात उमेदवाराची घोषणा केली आहे. ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब यांनी प्रहार पक्षामध्ये प्रवेश केला असून त्यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघातून (Amravati Lok Sabha 2024) उमेदवार म्हणून घोषित केलं आहे.

आजचा दिवस भावनिक आहे.आयुष्यातील मोठा निर्णय आज घेत आहे. गेल्या अनेक वर्षापासून मी शिवसेनेत आहे. सामाजिक कार्य मोठ्या प्रमाणावर केलं आहे. आमच्या चार पिढ्या या सामाजिक कार्यात आहे. हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. पण एक वर्षांपूर्वी अरविंद सावंत यांनी सांगितलं की इथे शिवसेनेचे काम नाही आणि हा मतदारसंघ काँग्रेसला गेला. अनेक लोकांना प्रश्न पडले मतदान कोणाला करावे. अनेक लोकांनी मला फोन केले की निवडणुकीत उभे राहा. मला भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, प्रहार, शिवसेनेच्या नेत्यांनी फोन केले आणि निवडणुकीत उभे राहायला सांगितलं असल्याचं दिनेश बूब यांनी म्हटलं आहे.

मला जर निवडणुकीत निवडून दिल तर चुकीच्या लोकांना निवडून दिल याचा पश्चाताप होणार नाही मला निवडून दिल्यास मतदारांना अभिमान वाटेल जिल्ह्याच्या हितिहासासाठी मी निवडणुकीत उभा आहे. मी शिवसेनेचा राजीनामा दिला नाही शिवसेनेला मी मनातून काढू शकत नाही शिवसेना माझ्या रक्ता रक्तात आहे. शिवसेनेने जर पक्षातून काढलं तर तो त्यांचा अधिकार आहे. उमेदवारी कोणाला द्यायची हा पक्षाचा अधिकार आहे, असं दिनेश बूब म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल