नवरात्रीमुळे टीम इंडियाच्या वेळापत्रकात झाला बदल, पाकिस्तानविरुद्ध ‘या’ दिवशी करणार दोन हात

ODI World Cup 2023: विश्वचषकातील सर्वात महत्त्वाच्या सामन्यांपैकी एक असलेला भारत-पाकिस्तान (India vs Pakistan) सामना 14 ऑक्टोबर रोजी अहमदाबादमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने आयसीसी आणि बीसीसीआयशी सहमती दर्शवली आहे. विशेष म्हणजे याआधी दोन्ही संघांमधील हा सामना 15 ऑक्टोबरला होणार होता. मात्र, नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने सामन्याची तारीख एक दिवस आधी बदलण्यात आली.

दुसरीकडे, पाकिस्तानच्या आणखी एका सामन्याची तारीख बदलण्यात आली आहे. पाकिस्तानी संघ हैदराबादमध्ये 12 ऑक्टोबरऐवजी 10 ऑक्टोबरला श्रीलंकेशी भिडणार आहे. टीम इंडियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी तीन दिवसांचे अंतर राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

नवरात्रीनिमित्त भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याच्या तारखा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. खरे तर सुरक्षा यंत्रणांनी बीसीसीआयला नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने तारीख बदलण्यास सांगितले होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सुरक्षा पथके व्यस्त राहणार असल्याने सामन्यासाठी सुरक्षा व्यवस्था राखणे कठीण जाईल, असा युक्तिवाद एजन्सींनी केला.

यानंतर आयसीसी आणि बीसीसीआयने पाकिस्तान संघाच्या दोन गट सामन्यांच्या तारखेत बदल करण्याबाबत पीसीबीशी चर्चा केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) लवकरच याबाबत अपडेटेड वेळापत्रक जारी करू शकते. आणखी काही संघांच्या सामन्यांच्या तारखा बदलल्या जाऊ शकतात.

भारतीय संघाचे अपडेटेड वेळापत्रक
8 ऑक्टोबर – विरुद्ध ऑस्ट्रेलिया, चेन्नई
11 ऑक्टोबर- विरुद्ध अफगानिस्तान,दिल्ली
14 ऑक्टोबर- विरुद्ध पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर- विरुद्ध बांग्लादेश, पुणे
22 ऑक्टोबर- विरुद्ध न्यूजीलंड, धर्मशाला
29 ऑक्टोबर- विरुद्ध इंग्लंड,लखनऊ
2 नोव्हेंबर- विरुद्ध श्रीलंका, मुंबई
5 नोव्हेंबर- विरुद्ध दक्षिण अफ्रीका, कोलकाता
11 नोव्हेंबर- विरुद्ध नेदरलैंड, बेंगलुरु
15 नोव्हेंबर- विरुद्ध सेमीफाइनल-1, मुंबई
16 नोव्हेंबर- सेमीफाइनल-2,कोलकाता
19 नोव्हेंबर- फाइनल, अहमदाबाद