Anant Radhika Wedding | नीता अंबानींनी नवीन सुनेला भेट दिली मौल्यवान कार; विराट, अभिषेक आणि आमिरकडेही आहे ही कार

Anant Radhika Wedding : रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी जामनगरमध्ये त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी याच्या लग्नापूर्वीचे सेलिब्रेशन सुरू केले आहे. या उत्सवात देश-विदेशातील एक हजार पाहुणे जमतील अशी अपेक्षा आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन 3 दिवस चालणार आहे. ज्यामध्ये पाहुणे वेगवेगळ्या समारंभात सहभागी होतील.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी त्यांच्या नवीन सून राधिका मर्चंटला त्यांच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये (Anant Radhika Wedding) एक अनमोल कार भेट दिली आहे. या कारची किंमत 4.5 कोटी रुपये आहे आणि ती अभिषेक बच्चन, विराट कोहली आणि आमिर खान यांसारख्या देशातील प्रसिद्ध व्यक्तींचकडेही आहे. तसेच नीता अंबानी यांनी राधिका मर्चंटला लक्ष्मी-गणेश गिफ्ट हॅम्पर दिला आहे. त्यात चांदीच्या तुळशीच्या भांड्यांसह लक्ष्मी-गणेशाच्या मूर्तीचा समावेश आहे. याशिवाय, यात चांदीचा स्टँड देखील आहे.

अंबानी कुटुंबाने ही कार राधिका मर्चंटला भेट म्हणून दिली
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी त्यांची नवीन सून राधिका मर्चंटला 4.5 कोटी रुपयांची ब्रिटिश कार बेंटले कॉन्टिनेंटल जीटीसी स्पीड भेट दिली आहे. ही कार देशातील निवडक सेलिब्रिटींच्या मालकीची आहे.

बेंटले कॉन्टिनेंटल जीटी स्पीड इंजिन
या कारमध्ये 5950cc इंजिन आहे, जे 650 bhp पॉवर आणि 900 Nm पीक टॉर्क जनरेट करते. बेंटले कॉन्टिनेंटल जीटी स्पीड फक्त 3.6 सेकंदात 0-60 mph पर्यंत वेग वाढवू शकते.

बेंटले कॉन्टिनेंटल जीटी स्पीडची वैशिष्ट्ये
ही 4 सीटर पेट्रोल कार आहे. जे 12.9 किमी प्रति लिटर मायलेज देते. बेंटले कॉन्टिनेंटल जीटी स्पीडमध्ये मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, पॉवर ॲडजस्टेबल एक्सटीरियर रिअर व्ह्यू मिरर, टचस्क्रीन, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट स्टॉप बटण, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम, अलॉय व्हील आणि फॉग लाइट्स यांसारखी वैशिष्ट्ये आहेत.

तर बेंटले कॉन्टिनेंटल जीटी स्पीड अँथ्रासाइट आणि आर्क्टिक कलर ऑप्शन या दोन कलर ऑप्शनमध्ये येतो. लॅम्बोर्गिनी उरुस, फेरारी आणि GTB V6 हायब्रिड सारख्या कारशी त्याची स्पर्धा आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ दिवशी मुंबई इंडियन्स खेळणार आयपीएल २०२४चा पहिला सामना, पाहा पंड्याचे संघाचे वेळापत्रक

Sharad Pawar | सगळं दिलं पण पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, शरद पवार यांचा हल्लाबोल

मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे Ajit Pawar यांचे निर्देश; मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार