Divya Khosla Kumar | बॉलीवूडमधील आणखी एका कपलमध्ये मतभेद, टी-सीरिजचे मालक आणि पत्नी दिव्या खोसलाचा घटस्फोट होणार?

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमार (Divya Khosla Kumar) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. ती आणि तिचा नवरा आणि टी-सीरिजचे मालक भूषण कुमार (Bhushan Kumar) यांच्यात सर्वकाही ठीक नसल्याच्या बातम्या येत आहेत. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ‘कुमार’ हे आडनाव काढून टाकल्याचे सांगितले जात आहे. तसेच तिने टी-सिरीजलाही अनफॉलो केले आहे. त्यामुळे दिव्या-भूषणच्या घटस्फोटाची चर्चा जोर धरू लागली आहे.

दिव्या तिच्या आगामी ‘हीरो हिरोईन’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे ती साऊथ चित्रपटांमध्ये पदार्पण करणार आहे. बॉलीवूड चित्रपटांमध्ये, ती अखेरची ‘यारियां-२’ (२०२३) आणि ‘सत्यमेव जयते-२’ (२०२१) या चित्रपटांमध्ये दिसली होती.

आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, अलीकडेच तिने सोशल मीडियावर तिच्या नावामधून कुमार (Divya Khosla Kumar) काढून टाकले आहे, जे तिच्या पती भूषणचे आडनाव आहे. या घटनेनंतर इंटरनेट वापरकर्त्यांनी दोघांच्या घटस्फोटाची अटकळ बांधण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी दिव्या खोसला सोशल मीडियावर तिच्या नावासोबत ‘कुमार’ जोडायची. अशीही चर्चा आहे की, दिव्याने तिच्या पतीची कंपनी टी-सीरीजला सोशल मीडियावर अनफॉलो केले आहे.

दिव्या आणि भूषण यांची पहिली भेट ‘अब तुम्हारे हवाले वतन साथियों’ चित्रपटाच्या सेटवर झाली होती. येथूनच त्यांच्या प्रेमाच्या चर्चा रंगल्या होत्या. दीर्घ काळानंतर दिव्याने 13 फेब्रुवारी 2005 रोजी जम्मूच्या वैष्णो देवी मंदिरात भूषणसोबत लग्न केले. कुमार भूषण हे दिवंगत गुलशन कुमार यांचे पुत्र आहेत. दिव्या ही त्यांची सून. अशा परिस्थितीत त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर ट्रेंडमध्ये आहे.

महत्वाच्या बातम्या :

मनोज जरांगे हेकेखोर, त्याला काडीची अक्कल नाही; जरांगे पाटलांवर सर्वात मोठा आरोप

‘व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा!’

Maratha Reservation ने महायुती सरकारचा पारदर्शी प्रामाणिकपणा सिद्ध! भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे प्रतिपादन