IPL 2024 | मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाला पुन्हा वादाची फोडणी! रोहित शर्माची पत्नी रितिकाने दिली अशी प्रतिक्रिया

IPL 2024 – भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पुन्हा एकदा त्याच्या कर्णधारपदामुळे चर्चेत आला आहे. अलीकडेच रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहने मुंबई इंडियन्सचे (Mumbai Indians) प्रशिक्षक मार्क बाउचर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देऊन सोशल मीडियावर वातावरण तापवले होते. आता पुन्हा एकदा रोहित शर्माचे कर्णधारपद(IPL 2024) चर्चेत आहे. रोहितच्या कर्णधारपदावर रितिकाने पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूया…

रितिका सजदेहची प्रतिक्रिया व्हायरल होत आहे
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना टीम इंडियाने जिंकला आहे. हा विजय भारतासाठी ऐतिहासिक विजय ठरला. राजकोट कसोटीत भारताने इंग्लंडचा ४३४ धावांनी पराभव करून कसोटी क्रिकेटमधील सर्वात मोठा विजय मिळवला. या विजयानंतर एका व्यक्तीने रोहित शर्माच्या कर्णधारपदावर एक कविता लिहिली. ज्यामध्ये त्याने तिसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्माच्या शतकावर, यशस्वी जैस्वालच्या अविश्वसनीय खेळी आणि भारताच्या सर्वात मोठ्या विजयावर कविता ऐकवली. ही कविता ‘इंडियन क्रिकेट कॉमेडी’ नावाच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर करण्यात आली आहे. कवितेचे कॅप्शन ‘तुला हा निस्वार्थी कर्णधार आठवेल का?’ रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेह हिने जेव्हा ही कविता पाहिली तेव्हा तिने भावनिक प्रतिक्रिया दिली.

या कवितेत त्या व्यक्तीने म्हटले आहे की, रोहित शर्माने शतक झळकावूनही सेलिब्रेशन केले नाही. जवळ आलेली आणि नंतर पुन्हा निघून गेलेल्या आयसीसी ट्रॉफीच्या दु:खात तो अजूनही मग्न आहे. राजकोट कसोटीच्या पहिल्या डावात भारताने अवघ्या ३३ धावांत ३ विकेट गमावल्या. यानंतर रोहित शर्माने डावाची धुरा सांभाळत १३१ धावांची शानदार खेळी केली. यानंतर यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल आणि सरफराज खान यांनी दुसऱ्या डावात चमकदार कामगिरी केली. या कवितेत असेही नमूद करण्यात आले आहे की, अनेक मोठे खेळाडू संघात नसतानाही तरुणांनी संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली, हे देखील केवळ रोहित शर्मामुळेच शक्य झाले आहे. या कवितेवर आपली प्रतिक्रिया देऊन रितिका सजदेहने या कवितेत किती तथ्य आहे हे दाखवून दिले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ दिवशी मुंबई इंडियन्स खेळणार आयपीएल २०२४चा पहिला सामना, पाहा पंड्याचे संघाचे वेळापत्रक

Sharad Pawar | सगळं दिलं पण पाच टक्केही निष्ठा पाळली नाही, शरद पवार यांचा हल्लाबोल

मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे Ajit Pawar यांचे निर्देश; मुळशी परिसरासह पुण्याच्या पश्चिम भागाला अतिरिक्त पाणी मिळणार