राष्ट्रवादीमध्ये राजीनामा सत्र सुरुच, ‘या’ मातब्बर नेत्याने दिला थेट आमदारकीचा राजीनामा 

Mumbai – ‘लोक माझे सांगाती’ या आपल्या राजकीय आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाच्या प्रकाशनाच्यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी (Sharad Pawar) राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा (Sharad Pawar Announced Retirement) देत असल्याची घोषणा केली आणि एकच खळबळ उडाली आहे.

शरद पवारांनी हा निर्णय घेऊ नये यासाठी सर्वच नेत्यांनी त्यांना गळ घातली. यानंतर आता राष्ट्रवादीत राजीमान्यांचे सत्र सुरू झाले आहे. राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी त्यांच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे त्यांनी ही घोषणा केली आहे. तर दुसऱ्या बाजूला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद आमदार अनिल पाटील हे राजीनामा देत असल्याचे पत्र शरद पवार यांना दिलेले आहे.

राज्यात अनिल पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत, तसेच प्रतोद म्हणूनही काम पाहतात. पाटील यांनी आज सिल्वर ओकवर शरद पवार यांची भेट घेत राजीनामा पत्र दिले आहे. मात्र आमदारकीचा राजीनामा हा विधान सभा अध्यक्षांना द्यावा लागतो, मात्र अनिल पाटील यांनी पदाचा राजीनामा देत असल्याचे पत्र शरद पवार यांना दिले आहे.एबीपीने याबाबत वृत्त दिले आहे.