”माझ्यासोबत एक रात्र झोप…’, प्रसिद्ध अभिनेत्री Ankita Lokhande चा खळबळजनक आरोप

Ankita Lokhande On Casting Couch: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री अंकिता लोखंडे ही सध्या बिग बॉस मुळे चर्चेत आहे. सोशल मीडियावर अंकिता आणि तिचा पती विक्की जैन यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर सातत्याने ट्रेंडमध्ये येत असतात. नुकताच या शोदरम्यान अंकिताने कास्टिंग काऊचचा अनुभव सांगितला आहे.

अंकिता लोखडेला (Ankita Lokhande) एक नव्हे तर दोनदा अशा भयंकर अनुभवातून जावे लागले. अंकिता 19-20 वर्षाची असताना तिला पहिल्यांदा कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला होता. अंकिताने तिच्या करिअरची सुरूवात केली होती, त्यावेळेस तिच्याकडे एका दाक्षिणात्य चित्रपटाची ऑफर आली होती. या चित्रपटासाठी तिला तडजोड करण्यास सांगितले गेले होते.

मी रूममध्ये एकटी होते. त्यावेळेस मी 19-20 वर्षाची होती. मी त्या व्यक्तीला विचारलं की तुमच्या निर्मात्याला कशी तडजोड हवी आहे? मला कुणाबरोबर पार्टीला किंवा डिनरला जावं लागेल का? असा प्रश्न अंकिताने निर्मात्याने पाठवलेल्या व्यक्तीला केला. मात्र निर्मात्याला आपल्याबरोबर एक रात्र घालवायची आहे, हे मला समजल्यावर मी खुप संतापले. त्यानंतर निर्मात्याच्या घाणेरड्या मागणीवरून अंकिताने त्याला चांगलेच झापले.

मला वाटतं तुमच्या निर्मात्याला फक्त मुलींबरोबर झोपायचं आहे. त्याला चांगल्या अभिनेत्रीबरोबर काम करण्याची इच्छा दिसत नाही. असं मी त्याला म्हणाले आणि तिथून निघून गेले, असे अंकिता तिच्या पहिल्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबाबत सांगते.

कास्टिंग काऊचच्या दुसरा अनुभवाभवाबाबत सांगताना अंकिता म्हणते, मी नाव घेऊ इच्छित नाही कारण तो फार मोठा अभिनेता आहे.मला त्याचा स्पर्श चुकीचा वाटला अन् मी पटकन हात मागे खेचला. माझं इथे काहीच होणार नाही हे मी ओळखलं. कारण तिथेही तडजोड करावी लागणार होती. त्यामुळे तिथून मी निघून गेले असे अंकिता लोखंडेने सांगितले.

महत्वाच्या बातम्या-