‘हाच का तो काँग्रेसचा महिला सन्मान?..’ अर्चना गौतम मारहाण प्रकरणावरुन भातखळकरांचा घणाघात

Archana Gautam Allegedly Assaulted : ‘बिग बॉस 16’ चा (Big Boss 16) भाग असलेली अभिनेत्री अर्चना गौतमबद्दल (Archana Gautam) मोठी बातमी येत आहे. नुकतेच काँग्रेस कार्यालयाबाहेर (Congress Office) अभिनेत्रीला मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अर्चनाने 2021 मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. आता शुक्रवार, 29 सप्टेंबर रोजी ती तिच्या वडिलांच्या नवी दिल्लीतील अखिल भारतीय समितीच्या कार्यालयात पोहोचली होती, तेथे तिला कार्यालयात जाऊ दिले नाही, उलट तिच्याशी गैरवर्तन करण्यात आले. यावर आता राजकीय क्षेत्रातून प्रतिक्रिया उमटत आहेत.

महिला आरक्षण विधेयकासाठी (Maratha Reservation) पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge) आणि प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांचे अभिनंदन करण्यासाठी अर्चना आपल्या वडिलांसोबत गेली होती. मात्र येथे तिच्यासोबत कार्यकर्त्यांकडून गैरवर्तनाला सामोरे जावे लागले. या संपूर्ण प्रकरणाचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. येथे अर्चना काही लोकांशी वाद घालताना दिसत आहे, परंतु तिचे वडील तिला वेगाने आपल्या कारकडे घेऊन जात आहेत आणि अनेक लोक अर्चनाला ओरडत तिच्या मागे चालत आहेत.

या प्रकरणी आता भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘हाच का तो काँग्रेसचा महिला सन्मान?…खतरों के खिलाडी आणि बिग बॉस फेम अभिनेत्री आणि काँग्रेसच्या लोकसभेच्या उमेदवार राहिलेल्या अर्चना गौतम हिला दिल्लीतील काँग्रेस कार्यालयाबाहेर असलेल्या काही महिलांनी धक्काबुक्की करून शिवीगाळ केली आणि कार्यालयाबाहेरून हुसकावून लावले.काँग्रेससाठी या देशात सोनिया गांधी आणि प्रियांका वाड्रा या दोनच सन्माननीय महिला आहेत. बाकी सगळ्या महिलांची पात्रता अर्चना गौतम एवढीच, हीच काँग्रेसची घृणीत मानसिकता आहे.’ अशा शब्दांत अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

https://youtube.com/shorts/LLrVrVQpCd4?si=eqsX7Qv1NCTZNyMe

महत्त्वाच्या बातम्या-

World Cup 2023: एक असा खेळाडू, जो स्वबळावर टीम इंडियाला बनवू शकतो विश्वविजेता

Rohit Pawar : सूड कसा उगवायचा याचा निर्णय…; ‘बारामती ॲग्रो’ प्रकरणी रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ram Satpute : लोकसभेसाठी सोलापूरमधून राम सातपुते ? शेतकऱ्यांचा, युवकांचा बुलंद आवाज आता दिल्लीत घुमणार ?