छाप्यात सापडलेले पैसे माझे नाही तर ते…; अर्पिता मुखर्जीचा कबुलीजबाब

west-bengal-ssc-scam-: पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्याच्या (west-bengal-ssc-scam) तपासात अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीची टीम तपासात व्यस्त आहे. दरम्यान, ईडीच्या सूत्रांनी सांगितले की, अर्पिता मुखर्जीने (Arpita Mukherjee) चौकशीदरम्यान खुलासा केला आहे की तिच्या घरातून जप्त केलेले सर्व पैसे पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांचे आहेत. अर्पिता मुखर्जीने दावा केला की पार्थचे माणसे येथे पैसे आणत असत किंवा कधी कधी मंत्री पार्थ चॅटर्जी (Partha Chatterjee) स्वतः यायचे. असं तिने सांगितलं आहे.

पश्चिम बंगालचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी हिने दावा केला की तिलासुद्धा पैसे ठेवलेल्या खोलीत प्रवेश दिला जात नव्हता. पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यात ईडीच्या कबुलीजबाबात अर्पिता मुखर्जीने जप्त केलेले सर्व पैसे पार्थ चॅटर्जीचे असल्याचे म्हटले आहे. आपलीच माणसे येथे पैसे आणत असल्याचा दावा त्यांनी केला. मिळालेल्या माहितीनुसार, अर्पिता मुखर्जी काल रात्रीपासून रडत होती. ईडीच्या चौकशीनंतर ती तुटली आहे. ती रात्री उशिरा झोपली असल्याचे सांगण्यात येत आहे. स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगून त्यांनी मला याबाबत काहीही माहिती नसल्याचे सांगितले. मला त्या खोलीत प्रवेशही दिला जात नव्हता.

दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पार्थ चॅटर्जी यांचे स्वीय सचिव सुकांता आचार्य यांना आज पुन्हा एजन्सीच्या कोलकाता येथील मुख्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. पश्चिम बंगाल शिक्षक भरती घोटाळ्याच्या (एसएससी स्कॅम) तपासात गुंतलेल्या ईडीच्या पथकाने आणखी एक नोटांचा साठा जप्त केला आहे. ईडीने बेलघारियामध्ये 28 कोटी 90 लाख रुपये आणि सुमारे 5 किलो सोने जप्त केले आहे. ही रोकड मोजण्यासाठी अनेक मशीन्स मागवण्यात आल्या होत्या.