Daund Murder : यवतमध्ये ४६ वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून

सचिन आव्हाड / दौंड – दौंड तालुक्यातील यवतमध्ये एका व्यक्तीचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.हा खून पालखी तळाजवळ असणाऱ्या मंदिरा शेजारी झाला आहे . असून मृत व्यक्तीचे नाव संजय बनकर,वय. ४६ वर्षे,रा.सोलापूर ) असे आहे. लोकवस्तीजवळ हा खून झाल्याने यवत परिसरात खळबळ माजली आहे.

खून झाल्याची २७ जुलै रोजी सकाळी ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच यवतचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. यानंतर यवत पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे.

या घटनेची माहिती मिळताच यवत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तपास यंत्रणा वापरत या व्यक्तीची ओळख पटवण्यात यश मिळवले आहे. संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव संजय सखाराम बनकर असे असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तो सोलापूर शहरातील रहिवाशी असल्याची माहिती पुढे आली आहे. लोकवस्तीत इतक्या भयंकर पद्धतीने खून झाल्याने यवत परिसरात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.