सीता अपहरणाच्या सीन नंतर अरविंद त्रिवेदींनी मागितली होती दीपिकाची माफी!

मुंबई : १९ व्या शतकात दूरदर्शनवरील ‘रामायण’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय होती. या मालिकेतील पात्र देखील अनेकांच्या पसंतीस पडली होती. या मालिकेतील रावणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांनी याच्या 82 व्या वर्षी कांदिवली येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच काळापासून आजारी होते, पण काल रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला. रामायणामधील त्यांची रावणाची भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरली होती.

अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी म्हणाले की, मागील 3 वर्षांपासून त्यांची तब्येत खूपच खालावली होती. या काळात त्यांना अनेक वेळा रुग्णालयात दाखल करावं लागलं. ते महिन्याभरापूर्वीच रुग्णालयातून घरी परतले होते. मात्र मंगळवारी रात्री 9.30 च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांनी कांदिवली येथील त्यांच्या घरी अखेरचा श्वास घेतला.

अरविंद त्रिवेदींची ‘रामायण’ मधील रावणाची भूमिका ही प्रेक्षांना खूप आवडली होती. रामानंद सागर यांचे ‘रामायण’ 1987 मध्ये प्रेक्षकांनी अक्षरशःडोक्यावर घेतले होते. या शोमध्ये दीपिका चिखलियाने सीतेची भूमिका साकारली होती. अरविंद त्रिवेदींच्या अंतयात्रेत सहभागी झाल्यानंतर दीपिका चिखलिया या भावूक झाल्या होत्या. त्यांनी एका मुलाखतीत अरविंद त्रिवेदींसोबतच्या आठवणींना उजाळा दिलाय. रामायणमध्ये ‘सीता अपहरणाच्या’ सीन नंतर त्रिवेदींनी त्यांची माफी मागितल्याचा किस्सा सांगताना दीपिका चिखलियाचे डोळे पाणावले होते.

दीपिकाने अरविंद त्रिवेदींसोबत काम करण्याचा अनुभवही शेअर केला. त्या म्हणाले, ‘सीता अपहरणाच्या दृश्यादरम्यान, अरविंद मला खेचत होते, माझे केस ओढत होते. त्यांना प्रत्यक्षात या सीनबद्दल खूप काळजी वाटत होती आणि वाईट देखील वाटत होते. एका अभिनेत्यासाठी असा सीन करणे हे थोडे कठीण आहे. तो गुजराती होता आणि तो मला सतत विचारत होता की तुला लागले तर नाही ना? मी त्याला सांगायचे की मी ठीक आहे आणि काळजी करण्यासारखे काही नाही.

दीपिका पुढे म्हणाली की, त्या सिंची मागणी होती की त्यांना माझे केस पकडून ओढावे, जेणेकरून ते दृश्य खूप नैसर्गिक दिसेल. ते या गोष्टीमध्ये अडकला होता की हा सीन खरा दिसेल आणि मला दुखणारही नाही. मला अजूनही आठवते की अरविंदजींनी संपूर्ण माध्यमांसमोर माझी माफी मागितली होती, ती सुद्धा सीता अपहरणाच्या दृश्यासाठी. ते अत्यंत धार्मिक व्यक्ती होते. सीन केल्यानंतर त्यांना बरे वाटत नव्हते. ते शिवभक्त होते. तो एक चांगला माणूस होता, असं देखील दीपिका म्हणाल्या.

हे ही पहा: