रिंकू सिंगच्या धडाकेबाज खेळीच्या प्रेमात पडली पॉर्न स्टार; कौतुक करत म्हणाली, ‘रिंकू…’

अहमदाबाद| कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स (KKRvsGT) संघात झालेला आयपीएल २०२३ मधील १३वा सामना अतिशय थरारक राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात संघाने ४ बाद २०४ धावा केल्या होत्या. गुजरातच्या २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याकडून रिंकू सिंग (Rinku Singh) याने शेवटच्या षटकात महत्त्वपूर्ण खेळी करत संघाला ३ विकेट्सने विजय मिळवून दिला. रिंकू सिंगने शेवटच्या षटकात सलग ५ षटकार ठोकत समस्त क्रिकेटरसिकांचे लक्ष वेधले. रिंकूच्या या धडाकेबाज खेळीवर पॉर्न स्टार केंद्रा लस्ट हीदेखील फिदा झाली आहे.

रिंकूने गुजरातविरुद्ध २१ चेंडूत ६ षटकार आणि एका चौकाराच्या मदतीने नाबाद ४८ धावा केल्या होत्या. यादरम्यान विसाव्या षटकात त्याने सलग ५ षटकार ठोकले. त्याच्या या धुव्वादार फटकेबाजीने कोलकात्याचा संघमालक आणि किंग खान शाहरुख खानदेखील प्रभावित झाला. रिंकूच्या या धमाकेदार खेळीने अगदी अडल्ट स्टार केंद्रा लस्ट (Porn Star Kendra Lust) हिचेही लक्ष वेधले आहे.

पॉर्न स्टारने तिच्या ट्विटर अकाऊंटवर रिंकू सिंगसोबतचा स्वतःचा एडिट केलेला फोटो शेअर केला आणि केकेआरच्या फलंदाजाला ‘रिंकू – द किंग’ म्हणत त्याची पाठ थोपटली आहे.

‘लॉर्ड’ रिंकू सिंगवर केंद्रा लस्टचे ट्विट लगेच व्हायरल झाले आणि एका भारतीय वापरकर्त्याने तिला आयपीएल पाहण्यासाठी भारतात येण्यास सांगितले, ज्याला अडल्ट स्टारने “मजेदार असेल” असे उत्तर दिले. या ट्विटवरुन अनेकांनी केंद्रा लस्टला ट्रोलदेखील केले आहे.

https://twitter.com/KendraLust/status/1645077862297358337?s=20

रिंकू सिंग हा एकमेव भारतीय क्रिकेटपटू नाही ज्याने एका लोकप्रिय पॉर्न स्टारचे लक्ष वेधले आहे. केंद्रा लस्ट भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचीही चाहती आहे आणि तिला लवकरच त्याला भेटण्याची इच्छा आहे. केंद्रा लस्ट सातत्याने क्रिकेटपटूंबद्दल ट्विट करत असते, ज्यामुळे तिचे नाव क्रिकेटशौकिंनामध्येही प्रसिद्ध होत आहे.