संजय राऊत यांच्या आईची केली थेट राजमाता जिजाऊ यांच्यासोबत तुलना; सुषमा अंधारे यांचा व्हिडीओ व्हायरल

Mumbai – काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा जाणता राजा असा उल्लेख करत थेट छत्रपती शिवरायांशी काहींनी तुलना केली होती. यानंतर आता पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडाची तुलना शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेशी केली आहे. दरम्यान, लोढा यांनी केलेल्या वक्तव्यावरून विरोधीपक्ष आता पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटावर टीका करू लागला आहे. दोन्ही बाजूंनी याबाबत प्रतिक्रिया येत आहेत.

एका बाजूला लोढा यांच्यावर विरोधक टीका करत असताना दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी तुरुंगात होते अशा खासदार संजय राऊत यांच्या आईची तुलना थेट राजमाता जिजाऊ यांच्यासोबत करताना दिसत आहेत. संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर त्या प्रतिक्रिया देत आहेत असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.