ज्यांना ‘छत्रपती संभाजीनगर’ मान्य नाही अशा औरंग्याच्या औलादींनी आपलं गाठोडं बांधावं आणि पाकिस्तानात चालतं व्हावं- भोसले

Aurangzeb : नामांतराच्या विरोधात छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून साखळी उपोषणाला सुरुवात झाली आहे. यावेळी एमआयएमचे (MIM) खासदार यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली.मात्र यावेळी या उपोषणस्थळी चक्क औरंगजेबाचे होर्डिंग झळकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

औरंगाबादच्या नामांतराला विरोध करत इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) उपोषणाला बसले आहे. पण उपोषणस्थळी जलील समर्थकांनी औरंगजेबच्या नावाने घोषणाबाजी करत फोटो झळकावला आहे. ‘जब तक सुरज चाँद रहेंगा, औरंगजेब तेरा नाम रहेंगा’ अशा घोषणाच या समर्थकांनी दिल्या. औरंगजेबाच्या घोषणाबाजी केल्यामुळे वाद पेटण्याची चिन्ह आहे.

दरम्यान, या मुद्द्यावरून आता आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी देखील टीकास्त्र सोडले आहे. ते म्हणाले, ज्यांना ‘छत्रपती संभाजीनगर’ मान्य नाही अशा औरंग्याच्या औलादींनी आपलं गाठोडं बांधावं आणि पाकिस्तानात (Pakistan) चालतं व्हावं असं भोसले यांनी म्हटले आहे.