‘औरंगजेब एक महान वैज्ञानिक होता, ज्याने आपल्या काळात विजेशिवाय चालणारे कारंजे तयार केले होते’

लखनौ – ज्ञानवापी मशिदीबाबत झालेल्या गदारोळावर प्रत्येकजण आपापली मते मांडत आहे. मशीद असलेल्या ठिकाणी शिवलिंग सापडल्याचा दावा केला जात असून, मशिदीचे अधिकारी हे कारंजे असल्याचे सांगत आहेत. यावर प्रसिद्ध कवयित्री अनामिका जैन अंबर यांनी एक लक्ष्यवेधी ट्वीट केले आहे.

अनामिका अंबरने ट्विटरवर लिहिले की, ‘औरंगजेब एक चांगला वास्तुविशारद तर होताच, शिवाय एक महान वैज्ञानिकही होता, ज्याने आपल्या काळात विजेशिवाय कारंजे बांधले होते.’

पत्रकार अनुराग मुस्कान नावाच्या युजरने लिहिले की, ‘इतकेच नाही तर ते स्कंद पुराणाचे जाणकार होते आणि त्यांना संस्कृतचे वेड होते, म्हणूनच त्यांनी स्कंद पुराणातील संस्कृत नाव ज्ञानवापी घेऊन मशिदीचे नाव ठेवले.’ आणखी एका यूजरने लिहिले की, ‘अकबर, बाबर, औरंगजेब फक्त भारतात महान आहेत, 56 इस्लामिक देशांमध्ये त्यांच्या नावावर काहीही नाही.’