सेमीफायनलमध्ये स्टेडियममधील सुंदर चेहऱ्याने वेधले लक्ष, पाकिस्तानची मिस्ट्री गर्ल चर्चेत

सिडनी: पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) संघात बुधवारी झालेला टी२० विश्वचषकातील पहिला उपांत्य फेरी सामना (Semi Final) बाबर आझमच्या संघाने ७ विकेट्सने जिंकला. शाहीन आफ्रिदीची उपयुक्त गोलंदाजी आणि कर्णधार बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांच्या अर्धशतकी खेळींच्या जोरावर पाकिस्तानने हा महत्त्वपूर्ण सामना जिंकत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. पाकिस्तानी खेळाडूंच्या प्रदर्शनाबरोबरच आणखी एक व्यक्ती या सामन्याचे आकर्षण ठरली.

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघातील उपांत्य सामना सुरू असताना स्टेडियममधून एक मुलगी चाहत्यांचे लक्ष वेधताना दिसली. ती पाकिस्तान संघाच्या विजयासाठी अल्लाहकडे हात जोडून प्रार्थना करताना दिसली. पाकिस्तानचे खेळाडू दमदार प्रदर्शन करत असताना कॅमेराकडे बघून फ्लाइंग किस देताना दिसली. तिच्या लूकने आणि पाकिस्तान संघाला चीयर करण्याच्या स्टाईलने कॅमेरामनचे लक्ष वेधले आणि तो सामन्यादरम्यान सतत तिच्यावर कॅमेरा फिरवताना दिसला.

https://twitter.com/NatashaOfficiaI/status/1590401267213684736?s=20&t=bdAFCXdTCVCIWDAfwMcnAQ

https://twitter.com/NatashaOfficiaI/status/1590531048265637888?s=20&t=bdAFCXdTCVCIWDAfwMcnAQ

पाकिस्तानच्या या मिस्ट्री गर्लचे (Mystery Girl) नाव नताशा असून तिने आपल्या ट्वीटर अकाउंटवर सामन्यादरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत. पाकिस्तानचा संघ अंतिम सामन्यात पोहोचल्यानंतर आता मिस्ट्री गर्ल नताशा अंतिम सामन्यातही स्टेडियममधून पाकिस्तान संघाला चीयर करताना दिसेल. अंतिम सामन्यात पाकिस्तानचा प्रतिस्पर्धी संघ कोणता असेल, हे आज होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England) सामन्याच्या निकालावरून कळेल. हा सामना ऍडलेड येथे दुपारी दीड वाजता सुरू होणार आहे.