राम मंदिराच्या उभारणीचे श्रेय राजीव गांधींना जाते… पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री असे का म्हणाले?

Begeshwar Dham Sarkar Pandit Dhirendra Krishna Shastri:- गेल्या काही दिवसांपासून अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. २२ जानेवारीला अयोध्या येथे हा भव्यदिव्य सोहळा पार पडणार आहे. दरम्यान बागेश्वर बाबांनी राम मंदिराबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

राम मंदिराचे श्रेय कोणाला?

धीरेंद्र शास्त्री यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, राम मंदिराच्या उभारणीचे श्रेय कारसेवकांना जाते, दोन लाखांहून अधिक बलिदान देणारे हिंदू, सर्वोच्च न्यायालयात रामाचे समर्थन करणारे वकील, तुलसीपीठाधिश्वर रामभद्राचार्य जी महाराज, पंतप्रधान डॉ. नरेंद्र मोदी आणि मौन व्रत पाळलेल्या लोकांना जाते. राजीव गांधींनी कुलूप उघडले म्हणून तर त्याचे श्रेय त्यांनाही जाते. आम्ही कुणाचीही बाजू घेत नाही.

22 जानेवारीला सुट्टी असावी?

पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, 22 जानेवारी हा दिवस केवळ उत्तर प्रदेशातच नाही तर संपूर्ण भारतात सुट्टीचा दिवस असावा. हा दिवाळीपेक्षा मोठा सण आहे. 22 जानेवारीला नवीन उत्सवाचे नियोजन केले जात असेल तर ते करावे. ते म्हणाले की, ज्या लोकांनी आमचे मंदिर पाडून मशीद बांधली, तेच आता पुन्हा मंदिर बांधत आहेत. अयोध्या फक्त एक झलक आहे, मथुरा आणि काशी बाकी आहे.

महत्वाच्या बातम्या-

MLA Disqualification Case Verdict : आम्हाला उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे – प्रकाश आंबेडकर

MLA Disqualification Case : शिंदे गटाकडून आनंदोत्सव, ठाकरे गटाचे आंदोलन

बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी गमावली; शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना

उलटतपासणीला न येणं ठाकरेंना पडलं महागात; नार्वेकरांनी दाखवून दिली चूक