“घराणेशाहीचा अंत झाला म्हणता, मग श्रीकांत शिंदे…”, संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर टीका

MLA Disqualification Case Verdict : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Maharashtra Chief Minister Eknath Shinde) यांचा गट हाच खरा शिवसेना राजकीय पक्ष असल्याचा निर्वाळा महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Maharashtra Assembly Speaker Rahul Narvekar) यांनी काल दिला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निकालाचे स्वागत करत असताना उबाठा गटावर टीका केली होती. “या निकालावरून एकाधिकारशाही आणि घराणेशाही मोडीत निघाली आहे. पक्ष स्वतःची संपत्ती समजून कोणीही मनाला वाटेल तसा निर्णय घेऊ शकत नाही. पक्ष म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नव्हे, हे भानही या निकालाने दिले आहे”, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते.

या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एकनाथ शिंदे (Eknath SHinde) यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant SHinde) यांना लक्ष्य केले आहे. घराणेशाहीचा अंत झाला, असे एकनाथ शिंदे म्हणत आहेत. मग श्रीकांत शिंदे हा तुमचा मुलगा नाही का? त्याला पद देताना माझा मुलगा आहे, त्याला पद द्या, असे सांगून पद घेतले होते. घराणेशाहीवर बोलण्याआधी तुम्ही श्रीकांत शिंदेवर बोला, असे प्रत्युत्तर संजय राऊत यांनी दिले.

बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्याकडे घराणेशाही कधीच नव्हती. विचारांचा वारसा पुढे घेऊन जाण्यासाठी त्या त्या कुटुंबातील लोक पुढे येतात. लोकांना ते स्वीकारायचे असेल तर ते स्वीकारतात नाहीतर त्यांना बाजूला करतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घरात घराणेशाही नाही. त्यांच्या घरातील लोक जर बाबासाहेबांचे विचार पुढे घेऊन गेले तरच लोक त्यांना स्वीकारतील, असेही संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

MLA Disqualification Case Verdict : आम्हाला उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूती आहे – प्रकाश आंबेडकर

MLA Disqualification Case : शिंदे गटाकडून आनंदोत्सव, ठाकरे गटाचे आंदोलन

बाळासाहेबांची शिवसेना उद्धव ठाकरेंनी गमावली; शिंदेंचा गट हीच खरी शिवसेना

उलटतपासणीला न येणं ठाकरेंना पडलं महागात; नार्वेकरांनी दाखवून दिली चूक