शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे खोटी, कपिल सिब्बल यांचा दावा

Shiv Sena Symbol: शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदे गटाची यावर केंद्रीय निवडणूक आयोगात आज महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. मात्र शिवसेना आणि धनुष्यबाण कुणाकडे जाणार याचा निर्णय आजही लागला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये सुरू असलेली ही सुनावणी आता शुक्रवारी, 20 जानेवारीला होणार आहे.

शिंदे गटाच्या कागदपत्रांची सत्यता तपासण्यासाठी ओळखपरेड करावी, अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली आहे. तसेच शिंदे गटाचे आमदार धनुष्यबाण चिन्हावर निवडून आले, असेही ते म्हणाले.शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे सादर केलेली कागदपत्रे खोटी असल्याचा दावा कपिल सिब्बल यांनी युक्तीवादादरम्यान केला होता. हा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी खोडून काढला आहे. शिंदे गटाच्या कागदपत्रात कोणत्याही त्रुटी नाहीत, असं ते म्हणाले.