लाइव्ह मॅचमध्ये बाबर आझम चीटिंग करताना पकडला गेला, अफगाणिस्तानच्या बॉलरने दाखवला इंगा 

Babar Azam :  विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत (ODI World Cup 2023), काल चेन्नई इथे झालेल्या सामन्यात अफगाणिस्तान संघाने पाकिस्तान संघावर (Pakistan vs Afghanistan) 8 गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तान संघाने अफगाणिस्तान संघासमोर 283 धावांचं लक्ष ठेवलं होत. अफगाणिस्तानच्या पहिल्या तीन फलंदाजांनी अर्धशतक झळकावत संघाला मजबूत स्थितीत नेलं. आणि 49व्या षटकातच हे लक्ष्य पार केलं. अफगाणिस्तानच्या इब्राहीम झदरान याने सर्वाधिक, 113 चेंडूत 87 धावा फटकावल्या.

पाकिस्तानच्या डावातील 16व्या सामन्यात मोहम्मद नबी गोलंदाजीसाठी आला आहे. षटकाचा पहिला चेंडू टाकत असताना, नॉन-स्ट्रायकरच्या टोकाला उभा असलेला बाबर आझम (Babar Azam) चेंडू टाकण्यापूर्वीच क्रीझबाहेर असल्याचे त्याने पाहिले, तेव्हा नबीने त्याला चेंडू टाकण्यापूर्वीच त्याला बाद करण्याचा इशारा केला .

नबीने हा नियम वापरून त्याला बाहेर देण्याची धमकी दिल्यानंतर, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने त्याची बॅट क्रीजमध्ये ठेवली. बाबर आझमचे हे वर्तन पाहून भारतीय क्रिकेट समर्थकांसह जगभरातील क्रिकेट समर्थक त्याच्या क्रिकेटच्या नैतिकतेवर सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करत आहेत.

https://youtu.be/_O7XOEdnngI?si=dWo8PCZVDaXHz5wr

महत्वाच्या बातम्या-

साप माणसाला चावला तर माणूस मरेल, पण स्वतःला चावला तर काय होईल?

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ‘राष्ट्रीय तालीम संघाची’ निवड चाचणी रविवारी

राज्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू व मार्गदर्शकांच्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ