येत्या चार वर्षात देशातले दोन कोटींपेक्षा जास्त शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळतील – Amit Shah

Amit Shah On Organic farming येत्या चार वर्षात देशातले दोन कोटींपेक्षा जास्त शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वळतील असा विश्वास केंद्रिय सहकार मंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय सहकारी निर्यात मंडळ अर्थात एनसीइएल च्या बोधचिन्हाचं, संकेतस्थळाचं आणि माहिती पुस्तिकेचं प्रकाशन काल शहा यांच्या हस्ते नवी दिल्लीत झालं, त्यावेळी ते बोलत होते.

बऱ्याच शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय शेतीची पद्धत स्वीकारली आहे आणि त्यांच्या सेंद्रिय उत्पादनांना खात्रीची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी सरकार काम करत आहे, असं शहा यांनी सांगितलं. देशातलं सहकार क्षेत्र मजबूत करण्यासाठी देखील सरकार प्रयत्नशील आहे. कृषी उत्पादनांची निर्यात वाढवणं आणि त्याद्वारे शेतकऱ्यांचं सक्षमीकरण करणं हे सरकारचं उद्दीष्ट असल्याचं ते म्हणाले.

शेतकरी, सहकारी संस्था आणि जागतिक बाजारपेठ यांच्या दरम्यान समन्वय साधण्याच्या कामी एनसीइएल संस्था मदत करेल असं शहा यांनी सांगितलं. सहकार क्षेत्रानंही इथेनॉल उत्पादनात लक्ष घातलं तर भारत जगातली जैवइंधनाची वाढती मागणी पूर्ण करण्यात सक्षम होऊ शकतो असं केंद्रिय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) या कार्यक्रमात म्हणाले.

https://youtu.be/_O7XOEdnngI?si=dWo8PCZVDaXHz5wr

महत्वाच्या बातम्या-

साप माणसाला चावला तर माणूस मरेल, पण स्वतःला चावला तर काय होईल?

Maharashtra Kesari : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी ‘राष्ट्रीय तालीम संघाची’ निवड चाचणी रविवारी

राज्यातील आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडू व मार्गदर्शकांच्या पारितोषिक रक्कमेत दहापट वाढ