CNG कार खरेदी करण्याचा विचार करताय? तर ‘या’ आहेत सर्वोत्तम मायलेज असलेल्या गाड्या

सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या कारचा (Best Mileage Cars) विचार केला तर प्रत्येकाच्या मनात एकच कंपनी येते आणि ती म्हणजे मारुती सुझुकी (Maruti Suzuki), आणि हे सत्य देखील आहे. सर्वाधिक मायलेज असलेल्या देशातील टॉप 5 सीएनजी कार मारुती सुझुकीच्या आहेत. या गाड्या मायलेजच्या बाबतीत चांगल्या आहेत आणि कमी देखभालची वाहने देखील आहेत. यामुळे लोक त्यांना सर्वाधिक पसंत करतात. या गाड्या कोणत्या आहेत, ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

  • मारुतीची लोकप्रिय हॅचबॅक आता K10C Dualjet 1.0L पेट्रोल इंजिनसह उपलब्ध आहे. हे इंजिन 66 Bhp पॉवर आणि 89 Nm टॉर्क जनरेट करते. सेलेरियो 5 स्पीड ऑटोमॅटिक आणि 5 स्पीड मॅन्युअल गियरच्या पर्यायासह येते. कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर ती एक किलो सीएनजीमध्ये 35.60 किमी अंतर पार करते.
  • वॅगन आर ही नेहमीच मारुतीची सर्वाधिक विक्री होणारी कार राहिली आहे. ही कार तिच्या मायलेजसाठी सर्वाधिक पसंत केली जाते. वॅगनआर दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. कंपनी यामध्ये 1.0 आणि 1.2 लीटर पेट्रोल इंजिन देते. WagonR चे CNG मॉडेल 1.0-लिटर इंजिनसह येते. वॅगनआरच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर ते 1 किलो सीएनजीवर 34 किमीपर्यंत चालते.
  • अल्टो, मारुतीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या वाहनांपैकी एक. मायलेजच्या बाबतीतही विश्वासाचे दुसरे नाव आहे. कारमध्ये 800cc 3 सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 41 PS पॉवर आणि 60 Nm टॉर्क जनरेट करते. कारचे मायलेजही जबरदस्त आहे. एक किलो सीएनजीमध्ये अल्टो 31.59 कि.मी. चे मायलेज देते.
  • मायलेजचा विचार केला तर मारुतीच्या कोणत्याही कारशी स्पर्धा करणे कठीण आहे. डिझायरच्या बाबतीतही तेच आहे. डिझायरचे सीएनजी मॉडेल जेथे 31 कि.मी. प्रति किलो मायलेज देते, तर पेट्रोल मॉडेल देखील 20 किमीचे मायलेज देते. Dzire मध्ये 1.2L 12C Dualjet इंजिन आहे, जे 76bhp पॉवर आणि 98Nm टॉर्क जनरेट करते.
  • स्विफ्टचे सीएनजी व्हेरियंट नुकतेच लाँच करण्यात आले आहे आणि कारने यामध्येही आपला जुना विश्वास कायम ठेवला आहे. स्विफ्ट, जी 1.2-लिटर K-Series Dualjet इंजिनसह येते, 77 PS पॉवर आणि 98 Nm टॉर्क जनरेट करते. कारच्या मायलेजबद्दल बोलायचे झाले तर एक किलो सीएनजीमध्ये ती 31 किमी पर्यंत धावते. हॅचबॅक सेगमेंटमध्ये स्विफ्टने नेहमीच स्वतःचे स्थान ठेवले आहे.