“काश्मीरसह पाकिस्तानही पाहिजे, बाळासाहेबांची भूमिका बजावा”; राज ठाकरेंना कुणी केलं आवाहन?

ठाणे येथील टेंभीनाका भागातील जैन मंदिरामध्ये शनिवारी सकाळी आयोजित कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित आहेत. या कार्यक्रमादरम्यान मंदिरात राज ठाकरे यांनी जैन धर्मगुरु श्रीमद विजय नित्यानंद सुरीषवर्जी म. सा. यांच्याशी संवाद साधला. यावेळी काश्मीरसह पाकिस्तानही हवा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यासारखीच भूमिका तुम्ही बजावा, असे आवाहन जैन धर्मगुरूंनी राज ठाकरे यांना केले आहे.

“तुमच्यामध्ये बाळासाहेबांची प्रतिमा दिसते, आम्हाला अखंड भारत पाहिजे, काश्मीरसह पाकिस्तानही हवा आहे. हे फक्त तुम्हीच करू शकता, बाळासाहेबांनी जशी भूमिका बजावली तशी भूमिका तुम्ही बजावा, बाळासाहेबांसारख्या तुमच्याकडून अपेक्षा आहेत,” असे आवाहन जैन धर्मगुरूंनी राज ठाकरे यांना केले.