“मलाच महाराष्ट्राचं राज्यपालपद नकोय”, भगत सिंह कोश्याची यांनी व्यक्त केल्या भावना!

मुंबई: महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर सध्या महाराष्ट्राची जनता नाराज आहे. त्यांनी गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रातील नागरिकांना दुखावणारी वक्तव्ये केली आहेत. त्यातही महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाष्य केल्यानंतर राजकीय नेतेही आक्रमक झाले आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यपालांना महाराष्ट्रातून हाकलण्याची मागणी केली होती. आता स्वत: राज्यपालाचे हे पद सोडण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, ‘महाराष्ट्रातलं राज्यपालपद नकोय’, अशी भावना भगतसिंह कोश्यारी यांनी (Bhagat Singh Koshyari) त्यांच्या निकटवर्तीयांकडे व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले होते राज्यपाल?
“छत्रपती शिवाजी महाराज हे तर जुने युगाचे आदर्श आहेत. लोकांना आज महाराष्ट्रातच त्यांचे नवे आदर्श सापडतील. ते बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून ते नितीत गडकरी आणि शरद पवार असू शकतात”, असे विधान कोश्यारी यांनी दिले होते.