असीम सरोदे यांना ठाकरेंनी नगरसेवक किंवा आमदारकीची तिकीट द्यावे; मातब्बर नेत्याची मागणी

Asim sarode Vs Prasad lad – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले आहेत. दरम्यान, नुकताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल दिला. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी असल्याचे जाहीर केले. मात्र या निर्णयावर वकील असीम सरोदे यांनी पत्रकार परिषद घेत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

यावर भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी भाष्य करत पलटवार केला आहे. असीम सरोदे यांना उद्धव ठाकरे यांनी नगरसेवक किंवा आमदारकीची तिकीट द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. एखाद्या गोष्टीची आणि व्यक्तीची चीड असू शकते परंतु, भारतीय संविधानाची आणि भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकाराची, न्यायव्यवस्थेची चीड करणं हा वैयक्तिक चीड करण्याचा भाग आहे. अशा ज्येष्ठ वकिलांना ते शोभत नसल्याचेही लाड यांनी म्हटलंय.

एखाद्या न्यायालयात उच्च पदावर, सुप्रीम कोर्ट, हायकोर्टात वकिली करणाऱ्या अशा माणसाने अशा प्रकारे जनतेच्या दरबारात येऊन न्यायालयाच्या विरोधात वक्तव्य करणं, प्रचारसभेत येऊन बोलणं हे असीम सरोदे सारख्या व्यक्तीला शोभत नाही. त्यांनी या गोष्टीचा विचार करावा, असे वक्तव्य करत प्रसाद लाड यांनी सल्ला दिला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्त्वाच्या बातम्या-

नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये बॉबी देओल कुंभकर्णाच्या भूमिकेत दिसणार? जाणून घ्या सत्य

‘हे’ आहेत जगातील सर्वोत्तम तांदूळ, तांदळाची ‘ही’ भारतीय जात पहिल्या क्रमांकावर

अरे हे काय? इशानसाठी देशापेक्षा IPL महत्त्वाचे! मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी टीम इंडियातून बाहेर

Sharad Mohol : शरद मोहोळ प्रकरणात अटकेत असणारा विठ्ठल शेलार नेमका कोण आहे?