प्रसिद्ध गायकाची १३ वर्षीय मुलीवर जबरदस्ती, ऑनलाइन पोस्ट केले आक्षेपार्ह फोटो

Bhojpuri Singer Babul Bihari : ‘केकर बाप के डर’, ‘बंसी के साली सपनवा में आती है’ यांसारख्या अनेक भोजपुरी गाण्यांना आपला आवाज देणारा भोजपुरी गायक अभिषेक उर्फ ​​बाबुल बिहारी (Babul Bihari) अडचणीत आला आहे. बाबुल बिहारी या नावाने प्रसिद्ध झालेल्या भोजपुरी गायकाला पोलिसांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक केली आहे. मुलीवर बलात्कारासोबतच (Babul Bihari Arrested) या गायकावर तिचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

भोजपुरी गायक बाबुल बिहारी याच्यावर बलात्काराचा आरोप दोन वर्षे जुना आहे. सिंगरने दोन वर्षांपूर्वी राजीव नगर परिसरात राहणाऱ्या १३ वर्षीय मुलीला लग्नाचे आमिष दाखवून हॉटेलमध्ये नेले आणि तेथे मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. एवढेच नाही तर मुलीचे आक्षेपार्ह फोटोही काढण्यात आले.

या घटनेनंतर अल्पवयीन मुलीने आरोपीपासून अंतर ठेवले आणि त्याच्याबद्दल कोणालाही सांगितले नाही. पण जेव्हा भोजपुरी गायकाने दोन वर्षांनी तिचे फोटो पोस्ट केले तेव्हा या काळ्या कृत्याचा पर्दाफाश झाला. पीडितेच्या कुटुंबीयांनी हे फोटो पाहिल्यानंतर मुलीची चौकशी केली. त्यानंतर पीडितेने त्या घटनेची सर्व माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच पीडित मुलीच्या पालकांनी पोलिसात जाऊन दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेची नोंद केली. पोलिसांनी आरोपींविरुद्ध प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (पोक्सो) कायदा आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवला आहे.

यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. वृत्तानुसार, बाबुलला शहरातील न्यायालयात हजर करण्यात आले, त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. भोजपुरी गायकाचे वय अवघे २१ वर्षे आहे. बाबुल बिहारी याचे यूट्यूब चॅनलवर २७,००० पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत.