Chandrakant Patil: शिवसेनेच्या साथीने माढा लोकसभा जिंकणार, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

Chandrakant Patil: करमाळा तालुक्यातील शिवसेनेची निर्णय ताकद असून गेली पंधरा दिवसापासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या आदेशाने तालुक्यातील व माढा लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वतःहून कामाला लागले आहेत. हे खऱ्या अर्थाने एकजुटीची पावती असून माढा लोकसभा विक्रमी मताने महायुती जिंकणार, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी व्यक्त केला. डॉक्टर श्रीकांत शिंदे डायलिसिस सेंटर येथे झालेल्या शिवसेनेच्या पदाधिकारी संवाद बैठकीत ते बोलत होते.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांना श्रीरामाची गुढी भेट दिली.  यावेळी माढा लोकसभेचे उमेदवार रणजीत सिंह नाईक निंबाळकर, शिवसेनेचे सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे, उपजिल्हाप्रमुख अनिल पाटील पंढरपूर, तालुकाप्रमुख शिवाजी बाबर, युवा सेना प्रमुख महादेव भोसले, करमाळा विधानसभा अध्यक्ष राहुल कांबळे, शिवसेना शहर प्रमुख संजय शीलवंत, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष आरती बसवंती, उपजिल्हाप्रमुख ज्योतीताई शिंदे, महिला शहर प्रमुख अनिता मोरे, युवा सेनेचे तालुकाप्रमुख नवनाथ गुंड, उपतालुकाप्रमुख प्रशांत नेटके, सतीश रुपनवर, जेऊर शहर प्रमुख सुयश करचे, युवा सेना शहर प्रमुख माधव सूर्यवंशी, तालुकाप्रमुख धर्मराज जगताप कल्लू राखुंडे, कोळगाव शाखाप्रमुख नागेश शेंडगे, आधी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना चंद्रकांत म्हणाले नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान करायचे आहे व तेही दोन तृतीयांश बहुमताने करायचे आहे यामुळे आपकी बार 400 पार ही घोषणा मोदी बरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे

शिवसैनिकांना अंतर पडू देणार नाही
यावेळी बोलताना खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर म्हणाले की, माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व शिवसैनिक संपर्क नेते संजय मशिलकर साहेबांच्या जवळपास दहा सभा या मतदारसंघात झाले असून यामुळे शिवसेनेकात नवचैतन्य आहे. याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; पहा कुणाला मिळाली संधी

Ravindra Dhangekar | आघाडीत बिघाडी : पुण्यात शिवसेना उबाठाचा रविंद्र धंगेकरांच्या प्रचाराला ‘जय महाराष्ट्र’

Nana Patole Accident: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा भीषण अपघात, गाडीचा चुराडा