‘लिज्जत पापड’चा उद्योग उभारून शेकडो हातांना काम देणाऱ्या जसवंतीबेन पोपट यांचे निधन

Jaswantiben Popat : ‘श्री महिला गृह उद्योग लिज्जत पापड’च्या (Lijjat Papad) सहसंस्थापक जसवंतीबेन जमनादास पोपट (वय 93) यांचे सोमवारी निधन (Jaswantiben Popat Passed Away) झाले. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचे राहत्या घरी निधन झाले, अशी माहिती त्यांच्या सून कानुबेन पोपट यांनी दिली.

गिरगाव येथील जगन्नाथ शंकर शेट रोडजवळील शंकर बारी लेनमधील हलिया लोहाणा निवास नावाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्या राहत होत्या. 21 तारखेला दादीशेठ अग्यारी लेन भाटिया ट्रस्ट हॉल येथे प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, जसवंतीबेन यांच्यावर शाही इतमामात अंत्यसंस्कार न झाल्याने सरकारच्या उदासीनतेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

https://youtu.be/FA8bsQpyrSM?si=LGgNkLbw7xLVtJ7f

महत्त्वाच्या बातम्या-
चंद्रयान करिता साहित्य बारामतीतून जाणे हे अभिमानास्पद बाब – MP Supriya Sule
बॅाईजची ही धमाल चौपट पटीने वाढणार; Boys-4मध्ये झळकणार दमदार कलाकारांची फळी
महायुतीच्या समन्वयक पदी संदीप खर्डेकर यांची नियुक्ती